विमान अपघातातून नवव्यांदा बचावले व्यंकय्या नायडू

By admin | Published: March 16, 2017 11:11 AM2017-03-16T11:11:08+5:302017-03-16T11:16:29+5:30

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत.

Venkaiah Naidu survived the ninth flight by plane crash | विमान अपघातातून नवव्यांदा बचावले व्यंकय्या नायडू

विमान अपघातातून नवव्यांदा बचावले व्यंकय्या नायडू

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत. बुधवारीदेखील असाच काहीसा प्रकार नायडूंसोबत घडला. व्यंकय्या नायडू आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना इंफाळ येथे घेऊन जाणा-या चार्टर्ड प्लेनमध्ये तांत्रिक दोष आढळून आले. यामुळे दोघांनाही इंफाळ दौ-याची योजना रद्द करावी लागली. 
 
व्यंकय्या आणि शहा मणिपूरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होत होते. मात्र विमानानं उड्डाण भरल्यानंतर 40 मिनिटांनंतर दोघंही पुन्हा दिल्लीत परतले.  नायडू आणि विमान अपघाताचा हा  प्रवास 2003 पासून सुरू झाला आहे. एअर डेक्कनच्या उद्घाटन प्रसंगी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली होती. यानंतर लँड करताना हेलिकॉप्टर अनेकदा कोसळण्यापासून बचावलेही. शिवाय, नायडूंसोहबत विमान अपघाताच्या घटना नागालँड, मेघालय, झारखंड आणि राजस्थानच्या सिरोमध्येही झाल्या आहेत. बुधवारी जेव्हा त्यांचे विमान दिल्लीकडे परतले तेव्हा, एका व्यक्तीने नायडू यांच्याबरोबर हवाई प्रवास करण्याची कुणामध्ये हिम्मत नसल्याचे म्हटले. पण, यावर शहा यांनी नायडू प्रत्येकवेळी सुरक्षित बचावल्याचे सांगितले.
(मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बीरेन सिंह)
 
दरम्यान, बुधवारी  भाजपाच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन. बीरेन सिंह यांचा बुधवारी शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सिंह यांना शपथ दिली. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या 8 सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार वाय. जॉयकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ईबोबी हेही उपस्थित होते.  ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतील ३२ सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
 
विमानात बिघाड झाल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. हे दोन्ही नेते ज्या विमानातून प्रवास करीत त्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी दिल्लीकडे न्यावे लागले. 
 

Web Title: Venkaiah Naidu survived the ninth flight by plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.