गुणांचे सत्यापन करणार : सॉफ्टवेअरच्या मदतीने गुणांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:16 AM2018-04-04T04:16:41+5:302018-04-04T04:16:41+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रथमच बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरने करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही पडताळणी करण्यात येणार आहे जेणेकरुन निकालाबाबत सवाल उपस्थित व्हायला नको. मागील वर्षीच्या चुकीपासून धडा घेत बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रथमच बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरने करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही पडताळणी करण्यात येणार आहे जेणेकरुन निकालाबाबत सवाल उपस्थित व्हायला नको. मागील वर्षीच्या चुकीपासून धडा घेत बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षी परिक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली होती. जेव्हा विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची रि-चेकिंग केली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचे ५ ते २६ गुण वाढले होते. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी परिक्षेचे निकाल तयार करण्यासाठी आउट लायर सॉफ्टवेअरची अखेरची चाचणी केली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (शालेय शिक्षण) उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, बोर्डाच्या आयटी विभागाने निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था केली आहे. बोर्डाच्या निकाला त्रुटी राहू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. बोर्डाचा असा दावा आहे की, यामुळे २०१८ च्या परीक्षा निकालात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा निकालातील चूक पहिल्या टप्प्यात पकडण्यासाठी यंदा आउट लायर सॉफ्टवेअर तयार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पाचपैकी दोन किंवा एका विषयात कमी गुण मिळाले म्हणजे, तीन विषयात या विद्यार्थ्याला ८० ते ९० टक्के गुण आहेत. तर, दोन विषयात ४० ते ५० गुण आहेत. अशावेही सॉफ्टवेअर तत्काळ अशा निकालाला लाल रंगात दाखवेल. विद्यार्थ्याला ज्या विषयात कमी गुण मिळाले आहेत त्या विषयांचे सत्यापन झाल्यानंतरच आउट लेअर निकालाला ग्रिन सिग्नल देईल.
बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी २६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या पार्श्वभूमीवर दीड कोटींपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासण्यात येतील. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर नोडल सेंटरवर मार्क्स स्लिप ऐवजी विद्यार्थ्यांचे गुण थेट सॉफ्टवेअरवर जातील आणि सॉफ्टवेअर कोणतीही चुकीची माहिती लाल रंगात दाखवून देईल. यामुळे प्राथमिक स्तरावरच निकालाचे सत्यापन होईल.