वर्मा यांची हेरगिरी का? - खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:02 AM2018-10-26T04:02:07+5:302018-10-26T04:02:18+5:30

सीबीआयच्या संचालकपदावरून दूर केलेल्या आलोक वर्मा यांची हेरगिरी का करीत आहात, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Verma's espionage? - Kharge | वर्मा यांची हेरगिरी का? - खरगे

वर्मा यांची हेरगिरी का? - खरगे

googlenewsNext

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकपदावरून दूर केलेल्या आलोक वर्मा यांची हेरगिरी का करीत आहात, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
सीबीआयच्या संचालकांची निवड करणाऱ्या समितीचे खरगे सदस्य आहेत. त्यांनी मोदी यांना लिहिलेल्या वर्मा यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार ना तुमच्याकडे आहेत ना केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी), असे म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी मोदी यांच्याकडे उत्तर मागितले आहे.
खरगे यांनी पत्रात दिल्ली स्पेशल पोलीस स्थापना कायद्याचा उल्लेख करून मोदी यांना आठवण करून दिली की, सीबीआयच्या संचालकाला ज्या समितीने निवडले, त्याला दूर करण्याचा, त्याची बदली करण्याचा वा सक्तीने रजेवर पाठविण्याचा अधिकार समितीला नाही.
आलोक वर्मा यांना मध्यरात्री पदावरून दूर करण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला. कारण, त्यामुळे वर्मा यांच्या टेबलवर असलेल्या व कारवाईची शक्यता असलेल्या फायली सीबीआयच्या मुख्यालयातून गायब करणे सरकारला शक्य झाले, असेही खरगे म्हणाले. या फायली राफेलशी संबंधित होत्या व प्रशांत भूषण, यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांच्या अर्जांच्या आधारे बनवल्या होत्या. पंतप्रधान कार्यालय आणि त्याच्याशी संबंधित लोक सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे हे पाऊल उचलले गेले. मोदी यांच्या पसंतीचे राकेश अस्थाना यांच्यावरील जबरी वसुलीसह अनेक आरोपांची चौकशी करणाºया अधिकाºयांना रात्रीतून दूर केले गेले, अशी टीका त्यांनी केली.
>हे का लपवत आहात?
खरगे यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यालय महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी दाबून टाकण्याचा प्रयत्न का करीत आहे? विशेषत: राफेल विमान खरेदी घोटाळ्याशी संबंधित गोष्टी का लपवल्या जात आहेत?

Web Title: Verma's espionage? - Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.