1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

By admin | Published: June 30, 2017 04:31 PM2017-06-30T16:31:35+5:302017-06-30T16:31:35+5:30

सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Very different in 1962 and 2017! India responds to China | 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

1962 आणि 2017 मध्ये खूप फरक ! भारताचे चीनला प्रत्युत्तर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सिक्कीमच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने दिलेल्या धमकीला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. तसेच चीनला दिलेल्या विस्तारित प्रत्युत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चुंबी घाटी परिसरातील तिबेटचा भूभाग असलेल्या डोकलममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करून रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही युद्धाची धमकी देणाऱ्या चीनला कडक शब्दात उत्तर देताना 1962 आणि 2017 मध्ये खूप फरक असल्याचे सांगितले.  दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर  भारताने नथूला खिंडीतून होणारी मानसरोवर यात्रा रद्द केली आहे. चीनने तणाव वाढल्यावर भारतीय यात्रेकरूंना सीमेवर रोखले होते.  
भारताने सिक्कीमच्या सीमेवरील तणाव आणि चीनकडून येत असलेल्या आक्रमक वक्तव्यांना प्रत्युत्तर म्हणून आक्रमक पवित्रा घेत आपल्या शेजाऱ्याला त्याच्याच शब्दात उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने 11 मुद्यांवर आधारित प्रत्युत्तर देत भारतीय जवानंवर घुसखोरीचे आरोप करणाऱ्या चीनच्या कांगाव्याचे पितळ उघडे पाडले आहे. चीनचा खोटारडेपणा उघड करताना भारताने सांगितले की, 16 जून रोजी पीएलएचे पथक डोकलम परिसरात रस्ता बनवण्यासाठी घुसले होते. मात्र रॉयल भूतान आर्मीने चिनी लष्कराला असे करण्यापासून रोखले. तसेच भूतान सरकारच्या राजदूतानेही आपण दिल्लीतील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून चिनी सरकारकडे आपला विरोध व्यक्त केल्याचे स्पष्टपणे सांगितले.  
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही एका वृत्तवाहिनीवर आयोजित कार्यक्रमात चीनला कठोर शब्दाच उत्तर दिले आहे.  चीन विस्तारवादी भूमिकेतून दुसऱ्या देशांच्या भूभागांवर कब्जा करत आहे. भारत आणि भूतानमध्ये संरक्षणविषयक करार झालेला आहे. त्यामुळे भारताला चीनच्या विस्तारवादाची चिंता लागणे साहजिकच आहे.  तसेच 1962 आणि 2017 यामध्ये खूप फरक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

Web Title: Very different in 1962 and 2017! India responds to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.