चक्क झोपड्या, तंबूत मतदान केंद्र; हेलिकॉप्टरने गेली निवडणूक पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 07:28 AM2018-11-12T07:28:07+5:302018-11-12T07:28:44+5:30
छत्तीसगडमध्ये आयोगाची परीक्षा : ३६ तास अगोदरच पाठविले साहित्य
राजनांदगाव : चहूबाजूने जंगलाने व्यापलेल्या दुर्गम प्रदेशातदेखील लोकशाहीतील महत्त्वाचा हक्क नागरिकांना बजावता यावा याकरिता निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. दुर्गम भागात मतदान केंद्र उभारण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना १० ते १५ मैलांची पायपीट करावी लागली आहे. तर काही ठिकाणी तर चक्क हेलिकॉप्टरनेच निवडणूक पथकाला अंतर्गत भागांमध्ये पोहोचविण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे सुमारे दोनशेहून अधिक मतदान केंद्र हलविण्यात आली आहेत. आपत्कालीन स्थितीत अनेक ठिकाणी तर कुठलेही शासकीय भवन नसल्याने तात्पुरते तंबू ठोकून मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत, असी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या निवडणुकांमध्ये उमेदवारांसोबतच निवडणूक आयोगाच्या कर्मचाºयांचीदेखील परीक्षा आहे. छत्तीसगड निवडणूक आयोगाकडून येथील मतदान केंद्रांवर ३६ तास अगोदरच निवडणूक कर्मचारी व सामान पाठविण्यात आले आहेत. बºयाच ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांना मतदानाच्या अगोदरचा एक दिवस केंद्रावरच काढावा लागला. घनदाट जंगल व डोंगरदºयांमध्ये असलेल्या सुमारे ६०० मतदारकेंद्रांवर कर्मचाºयांना हेलिकॉप्टरने पाठविण्यात आले.
नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेता तसेच मतदारांच्या सोयीसाठी बीजापूरमधील ७६ तर इतक ठिकाणचे मिळून एकूण १९८ मतदान केंद्र हलविण्यात आली आहेत. बस्तर, बीजापूर, सुकमा येथील दुर्गम प्रदेशातील खेड्यांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये मतदान केंद्र देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी योग्य सुविधाच उपलब्ध नाहीत. शिवाय अशा ठिकाणी खेड्यातील एखाद्या झोपडीत किंवा झाडाखालीच तंबू टाकून मतदानकेंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक पथकाला आवश्यक ते साहित्यदेखील पुरविण्यात आले आहे, अशी माहिती बीजापूर येथे निवडणूक आयोगातर्फे स्थापित नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश सिंह सिदार यांनी ह्यलोकमतह्णला दिली.
कर्मचाºयांकडूनच स्वयंपाक
दुर्गम प्रदेशात गेलेल्या निवडणूक कर्मचाºयांना मतदानाची व्यवस्था करण्यासोबतच स्वयंपाकाचेदेखील आव्हान पेलायचे आहे. ३६ तास अगोदरच मतदानकेंद्रांच्या ठिकाणी पोहोचलेल्या कर्मचाºयांसोबत जेवण तयार करण्याचे सामान देण्यात आले आहे. दुर्गम भाग असल्याने जेवणाची इतर व्यवस्था होऊ शकत नसल्याने हे करावेच लागत आहे असे मत अधिकाºयांनी व्यक्त केले.
आव्हान तर आहेच
मतदानाची संधी सर्वांना मिळायला हवी यासाठी निवडणूक आयोग कटीबद्ध आहे. यासाठीच दुर्गम क्षेत्रातदेखील पथक पाठविण्यात आले आहे. काही ठिकाणी तर आम्ही हेलिकॉप्टरनेदेखील कर्मचारी पाठविले आहेत. अंतर्गत भागामध्ये प्रतिकूल स्थितीत निवडणूका घेणे हे आव्हान तर आहेच. परंतु लोकशाहीच्या प्रगतीसाठी कुठल्याही परिस्थितीत सर्व अडचणींचा सामना करीत आम्ही ते पार पाडूच असा विश्वास बस्तर जिल्ह्याचे निवडणूक पर्यवेक्षक विश्वनाथ जोशी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केला.
१ लाखाहून अधिक जवान तैनात
राजनांदगाव : निवडणुकांवर नक्षलवाद्यांनी घातलेल्या बहिष्कारामुळे दक्षिण छत्तीसगडमध्ये १ लाखाहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. बंदुकींच्या गराड्यात लोकशाहीचे अमूल्य मत सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासन व निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे बुलेट विरुद्ध बॅलेट असाच संघर्ष दिसून येणार आहे.
पहिल्या टप्प्यात राजनांदगाव, बस्तर, कोंडागाव, सुकमा, बीजापूर, कांकेर (उत्तर बस्तर), नारायणपूर व दंतेवाडा (दक्षिण बस्तर) या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश ठिकाणी नक्षलवादाचा प्रचंड प्रभाव आहे. मागील पंधरवड्यात दक्षिण छत्तीसगडमध्ये विविध हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बस्तर व दंतेवाड्यात अगोदर घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता जास्त प्रमाणात सुरक्षादलाच्या तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत.
बस्तर विभागातील १२ मतदारसंघांमध्ये प्रचंड सुरक्षाव्यवस्था आहे. येथील सुमारे पंधराशे मतदारकेंद्र नक्षलप्रभावित भागात येतात. त्यातील नऊशेहून अधिक मतदारकेंद्र हे अतिसंवेदशील आहेत. खैरागड, डोंगरगड, डोंगरगाव, राजनांदगाव, खुज्जी या जागा वगळता इतर ठिकाणी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेतच मतदान होईल.
अर्धवट प्रचाराच्या आधारावर लढाई
राजनांदगाव : छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांवर नक्षलवाद्यांनी टाकलेला बहिष्कार व मागील काही दिवसांत झालेल्या नक्षली कारवायांचा परिणाम येथील दुर्गम भागात पाहायला मिळाला.
नक्षलींच्या भीतीमुळे उमेदवारांना प्रचारात अनेक अडचणी आल्या. सुकमा, दंतेवाडा, बीजापूर येथील उमेदवारांनी दुर्गम भागात जाऊन प्रचार करण्याचे टाळले. मनाजोगता प्रचार न झाल्याची खंत उमेदवारांमध्ये होती. सुकमा, कांकेर, दंतेवाडा, बीजापूर येथील अनेक ठिकाणी तर थोड्या आत असलेल्या गावांतदेखील प्रचार झालेला नाही.
नक्षलग्रस्त भागात प्रचार करणे ही मोठी कसरत आहे. या भागात ‘सोशल मीडिया’चा वापर अत्यल्प आहे. बहुतांश मतदारांकडे ‘मोबाइल’ नाही. सायंकाळनंतर तर बहुतांश ठिकाणी प्रचार झालाच नाही.
काही उमेदवारांनी धोका नको म्हणून पोलिसांची सुरक्षा नाकारून स्वत:ची खासगी सुरक्षा व्यवस्था नेमली आहे. पोलीस सुरक्षेमुळे नक्षल्यांच्या नजरेत येऊ. निवडणुकीनंतर नाहक अडचण होईल, अशी भावना सुकमाचे ‘आप’चे उमेदवार बल्लू राम भवानी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
भाजपासमोर आव्हान
भाजपाची छत्तीसगडमध्ये मागील १५ वर्षांपासून सत्ता असली तरी मागील निवडणुकांत दक्षिण छत्तीसगडमध्ये १८ पैकी १२ जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यंदा १८ पैकी १२ जागा या अनुसूचित जाती तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. मागील आठवड्यातच सतनामी समाजाचे गुरु बलदास यांनी काँग्रेसशी हातमिळावणी केली. अशा स्थितीत भाजपासाठी आरक्षित प्रवगार्तील जागांवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.