ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे निधन

By admin | Published: April 15, 2015 12:46 AM2015-04-15T00:46:27+5:302015-04-15T00:46:27+5:30

ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे निधन

Veteran literary villain Sarang passes away | ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे निधन

Next
येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक विलास सारंग यांचे मंगळवारी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते़ त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
कर्नाटकातील कारवारमध्ये १९४२ मध्ये जन्मलेल्या विलास सारंग यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिंस्टन कॉलेजमध्ये झाले़ त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत विपुल लिखाण केले आहे़ कथा, कादंबरी, काव्य व समीक्षा वाडमय प्रकारात त्यांनी ठसा उमटवला होता. इराकमधील बसरा विद्यापीठामध्ये त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले होते़ रुद्र, मॅनहोलमधील माणूस, सोलेदाद ही त्यांची पुस्तके विशेष गाजली़
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते़ त्यातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता़ मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली़ (प्रतिनिधी)

Web Title: Veteran literary villain Sarang passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.