लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तापस रॉय यांनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:54 PM2024-03-04T15:54:37+5:302024-03-04T16:02:03+5:30
Tapas Roy : राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते.
Tapas Roy : (Marathi News) कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तापस रॉय यांनी सोमवारी पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत पक्षाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसांत देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत तापस रॉय यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
तापस रॉय म्हणाले, "मी आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मी आता एक मुक्त पक्षी आहे.'' दरम्यान, पत्रकारांशी बोलताना तापस रॉय यांनी जानेवारीत त्यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला होता, तेव्हा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी टीका त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर केली. याचबरोबर, तापस रॉय म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाचा प्रामाणिक नेता आहे, पण मला कधीच माझे हक्क मिळाले नाहीत."
#WATCH | Kolkata: Tapas Roy says, "I resigned because I felt that I am not respected in this party, many times such situations arose where I felt this. The ED team reached my house on January 12th, it has been many days since the incident took place but no sympathy or cooperation… https://t.co/aFZV55vKnnpic.twitter.com/bP24wsPjXW
— ANI (@ANI) March 4, 2024
राज्य सरकारमधील मंत्री तापस रॉय हे बऱ्याच दिवसांपासून तृणमूल काँग्रेसवर नाराज होते. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. याआधी सोमवारी तृणमूल काँग्रेस नेते कुणाल घोष आणि ब्रत्य बसू यांनी तापस रॉय यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती, पण या भेटीचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर तापस रॉय यांनी राजीनामा दिला. तसेच, राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.