४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:42 PM2023-06-18T19:42:38+5:302023-06-18T19:42:57+5:30

NEET 2023 : वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला.

 Vibhu Upadhyay from Uttar Pradesh's Badayu district cleared the NEET exam with 622 marks in his first attempt  | ४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना

४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना

googlenewsNext

वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला. अनेक तरूण-तरूणींनी मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. अशातच उत्तर प्रदेशातील विद्यार्थी विभू उपाध्याय याने पहिल्याच प्रयत्नात ६२२ गुणांसह नीटची परीक्षा उत्तीर्ण केली. खरं तर बदायू जिल्ह्यातील रहिवासी असलेला विभू चार वर्षे गंगेत आरती करत होता. काशी या नगरीच्या परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवत विभू उपाध्याय २०१९ पासून कसबा काचला येथील भगीरथ घाटावर माँ गंगेची संध्याकाळची महाआरती नित्यनियमाने करत आहेत.

दरम्यान, हरिद्वार, काशी आणि काचला येथे सायंकाळी नियमितपणे माँ गंगेची आरती केली जाते. माहितीनुसार, विभू हा आपले धार्मिक काम करत-करत नीट परिक्षेची देखील तयारी करत होता. आज माँ गंगेच्या आशीर्वादाने त्याने NEET परीक्षेत ६२२ गुण मिळवले असल्याची भावना विभूच्या कुटुंबीयांमध्ये आहे. 

विभू उपाध्यायची गंगा माताप्रती नितांत श्रद्धा आहे. लक्षणीय बाब म्हणजे आयुष्यभर पवित्र गंगा मातेची आरती करत राहण्याचा मानस असल्याचे विभू सांगतो. इतकेच नाही तर विभूचे कुटुंब त्यांच्या या भक्तीसाठी देखील ओळखले जाते. गंगा मातेची रोज पूजा आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे विभू सांगतो.  

घरच्यांचा आनंद गगनात मावेना 
विभूचे वडील हरेंद्र उपाध्याय कचला शहरातील श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाटाचे सदस्य आहेत. आपल्या मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, २०१९ पासून विभू सतत माँ गंगेची आरती आणि सेवा करत आहेत. तसेच श्री गंगा आरती सेवा समिती भगीरथ घाट काचलाचे संस्थापक सदस्य पंडित किशनचंद्र शर्मा यांना विभू उपाध्याय यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, विभूची एमबीबीएसमध्ये झालेली निवड ही सन्मानाची बाब आहे.

Web Title:  Vibhu Upadhyay from Uttar Pradesh's Badayu district cleared the NEET exam with 622 marks in his first attempt 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.