R Hari Kumar Navy Chief: व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार नवे नौदल प्रमुख, ३० नोव्हेंबर रोजी स्वीकारणार पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 11:49 PM2021-11-09T23:49:42+5:302021-11-09T23:50:03+5:30
व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार हे वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ३० नोव्हेंबर रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील.
व्हाईस अॅडमिरल आर हरी कुमार (R Hari Kumar) हे नवे नौदल प्रमुख असतील. केंद्र सरकारनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. सध्या ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ आहेत. ते ३० नोव्हेंबर रोजी नौदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारतील. संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्याकडे नौदल प्रमुख पदाची सूत्र सोपवण्यात येणार असल्याची मंगळवारी रात्री घोषणा करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार विद्यमान नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग (Admiral Karambir Singh) रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. याच दिवशी आर. हरी कुमार हे आपला पदभार स्वीकारतील.
Vice Admiral R Hari Kumar has been appointed as the next chief of naval staff by the government. He is presently Flag Officer Commanding-in-Chief Western Naval Command and will take over his new office on November 30: Ministry of Defence pic.twitter.com/usn0JgxKA5
— ANI (@ANI) November 9, 2021
१२ एप्रिल १९६२ रोजी आर हरी कुमार यांचा जन्म झाला. त्यांना जानेवारी १९८३ मध्ये नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती देण्यात आली. त्यांनी निरनिराळ्या कमांड, स्टाफ आणि इंट्रक्शनल अपॉइंटमेंट्समघ्ये आपली सेवा बजावली आहे. ते 'सी कमांड' (Sea Command) मध्ये आयएनएस निशंक, मासाईल कार्व्हेट, आयएनएस कोरा आणि गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आयएनएस रणवीर सामील आहे. त्यांनी भारतीय नौदलाची विमानवाहू युद्धनौका INS विराटचंही नेतृत्व केलं आहे.
शील वर्धन सिंग CISF प्रमुख
दरम्यान, भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीलवर्धन सिंग आणि अतुल करवाल यांची मंगळवारी अनुक्रमे सीआयएफ (CISF) आणि एनडीआरएफचे (NDRF) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंग हे बिहार केडरचे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.