18 वर्षांनी लहान भाजप पदाधिकाऱ्याशी 45 वर्षीय भाजप नेत्याचा तिसऱ्यांदा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 02:49 PM2019-06-23T14:49:35+5:302019-06-23T14:54:42+5:30

अमलियार यांनी आपल्या वयाच्या 45 वर्षी लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे तिसरे लग्न आहे.

vice president bjp mahila morcha married with BJP leaders | 18 वर्षांनी लहान भाजप पदाधिकाऱ्याशी 45 वर्षीय भाजप नेत्याचा तिसऱ्यांदा विवाह

18 वर्षांनी लहान भाजप पदाधिकाऱ्याशी 45 वर्षीय भाजप नेत्याचा तिसऱ्यांदा विवाह

Next

गुजरात - गुजरातमधील एका भाजप नेत्याचे लग्न चांगलेच चर्चेत आले आहे. त्याच कारण काही तसेच आहे. दाहोद जिल्हाचे भाजप जिल्हा अध्यक्ष आणि भाजप नेते शंकरभाई अमलियार यांनी वयाच्या 45 वर्षी 27 वर्षांच्या तरुणीसोबत तिसऱ्यांदा लग्न केले आहे. विशेष म्हणजे याआधी त्यांनी एका आमदाराच्या बहिणीसोबत विवाह केला होता. मात्र नुकतेच त्यांनी भाजपच्या महिला मोर्च्याच्या उपाध्यक्ष सोबत तिसऱ्यांदा लग्न केल्याने चर्चेत आले आहे.

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील फतेपूर तालुक्यातील सिगड़ापाड़ा गावातील शंकरभाई अमलियार यांचा भाजपमध्ये चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याकडे दाहोद जिल्ह्यातील भाजपची जवाबदारी देण्यात आली आहे. मात्र सद्या ते माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे. आणि त्याचे कारण ठरले आहे त्यांचे तिसऱ्यांदा झालेलं लग्न.

अमलियार यांनी 20 जून रोजी आपल्या पक्षात काम करणाऱ्या भाजप महिला मोर्च्याच्या उपाध्यक्ष जल्पाबेन यांच्यासोबत लग्न केले आहेत. विशेष म्हणजे जल्पाबेन ह्या अमलियार यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत. जल्पाबेन ह्या एमएससी च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. मात्र त्यांनी 45 वर्षीय अमलियार यांच्यसोबत लग्नकेल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

अमलियार यांनी आपल्या वयाच्या 45 वर्षी लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे तिसरे लग्न आहे. अमलियार यांची पहिली पत्नी ह्या फतेपूर मतदार संघाचे आमदार रमेश कटारा यांच्या बहीण होत्या. मात्र त्यांच्या पत्नीचे 2010 मध्ये निधन झाले. त्यानंतर अमलियार यांनी 2011 ला ज्योत्सनाबेन नावाच्या महिलेंशी दुसऱ्यांदा लग्न केले. मात्र काही दिवसातच ते विभक्त झाले .

 

Web Title: vice president bjp mahila morcha married with BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.