Vice Presidential Election Live: आत्तापर्यंत 90 टक्क्याहून जास्त मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 03:47 PM2017-08-05T15:47:31+5:302017-08-05T15:49:23+5:30
नवी दिल्ली, दि. 5- उपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत 785 पैकी 761 खासदरांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानासाठी संसदेत सदस्य दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, खासदार सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत एकूण ७१३ खासदारांनी मतदान केलं होतं. तर आता तीन वाजे पर्यंत एकुण 761 खासदारांनी मतदान केलं आहे.
मतदानाची सुरूवात झाल्यावर सत्ताधारी एनडीए आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी सुरुवातीलाच मतदान केलं. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून मतदान केल्याची माहिती दिली. मतमोजणी आज संध्याकाळीच होणार असून त्यानंतर लगेचच देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव घोषित केलं जाणार आहे.
व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया
मतदानापूर्वी रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मी कुणाही विरोधात लढत नाहीय आणि आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढत आहे आणि अनेकांनी मला समर्थन दिले आहे. त्यामुळे ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे.
{{{{twitter_post_id####
#Delhi: NDA's Vice Presidential candidate Venkaiah Naidu reached Parliament to cast vote #VicePresidentialElectionpic.twitter.com/CeqGzi2zs3
— ANI (@ANI_news) August 5, 2017
#VicePresidentialElection: MPs arrive to cast their votes in Parliament. pic.twitter.com/BwYbFBQEEy
— ANI (@ANI_news) August 5, 2017
}}}}#VicePresidentialElection: Former PM Manmohan Singh, Congress VP Rahul Gandhi, former deputy PM Lal Krishna Advani at Parliament. pic.twitter.com/7WokgSGHd3
— ANI (@ANI_news) August 5, 2017
मतदान प्रक्रिया
उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतात. यावेळी बॅलेट पेपर कोणत्या प्रकारचे निवडणुकीचे चिन्ह नसते तर उमेदवाराचे नाव तेथे असते. एका विशेष प्रकारच्या शाईचा मतदानासाठी वापर केला जातो.
लोकसभेत बहुमत असलेल्या रालोआचे उमेदवार नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे समर्थन करणा-या बीजू जनता दल आणि जदयूने उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे. जदयूने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. पण, पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बदललेला नाही.
आज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणा-या मतदान प्रक्रियेत संसद सदस्य आपल्या पसंतीचे मत देण्यासाठी विशेष प्रकारच्या पेनचा उपयोग करतील. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले की, मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार आहे आणि रात्री सातपर्यंत निकाल हाती येतील. विशेष म्हणजे राजकीय पक्ष या निवडणुकीत व्हिप जारी करू शकत नाहीत. कारण, मतदान गोपनीय पद्धतीने होते.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एका
निर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.
राज्यसभेत भाजपाला ‘बळ’
लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.