Vice Presidential Election Live: व्यंकय्या नायडू विरुद्ध गोपाळकृष्ण गांधी, पंतप्रधान मोदींनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 09:45 AM2017-08-05T09:45:10+5:302017-08-05T10:43:43+5:30
उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली, दि. 5 - उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानासाठी संसदेत सदस्य दाखल होते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले आहे.
व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया
मतदानापूर्वी रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मी कुणाही विरोधात लढत नाहीय आणि आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढत आहे आणि अनेकांनी मला समर्थन दिले आहे. त्यामुळे ते सर्व निवडणुकीत मतदान करतील असा विश्वास आहे.
मतदान प्रक्रिया
उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतात. यावेळी बॅलेट पेपर कोणत्या प्रकारचे निवडणुकीचे चिन्ह नसते तर उमेदवाराचे नाव तेथे असते. एका विशेष प्रकारच्या शाईचा मतदानासाठी वापर केला जातो.
{{{{twitter_post_id####
#Delhi: NDA's Vice Presidential candidate Venkaiah Naidu reached Parliament to cast vote #VicePresidentialElectionpic.twitter.com/CeqGzi2zs3
— ANI (@ANI_news) August 5, 2017
I am a non-party man. Majority of parties in India are supporting my candidature, confident that they all will vote in election: Venkaiah pic.twitter.com/Xs7LgI92CY
— ANI (@ANI_news) August 5, 2017
I am not contesting against anybody,individual or party;I'm contesting for Vice President of India: Venkaiah Naidu #VicePresidentialElectionpic.twitter.com/z0Y3X0ASHJ
— ANI (@ANI_news) August 5, 2017
I am known to all members of Parliament & they are known to me,thats why I'm not even campaigning: Venkaiah Naidu #VicePresidentialElection
— ANI (@ANI_news) August 5, 2017
I have written a polite letter to everybody, response is very good.Confident that they all will support me:NDA's VP candidate Venkaiah Naidu pic.twitter.com/2Iwjt8AftO
— ANI (@ANI_news) August 5, 2017
}}}}#VicePresidentialElection: MPs arrive to cast their votes in Parliament. pic.twitter.com/BwYbFBQEEy
— ANI (@ANI_news) August 5, 2017
लोकसभेत बहुमत असलेल्या रालोआचे उमेदवार नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे समर्थन करणा-या बीजू जनता दल आणि जदयूने उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे. जदयूने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. पण, पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बदललेला नाही.
आज सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत होणा-या मतदान प्रक्रियेत संसद सदस्य आपल्या पसंतीचे मत देण्यासाठी विशेष प्रकारच्या पेनचा उपयोग करतील. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले की, मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार आहे आणि रात्री सातपर्यंत निकाल हाती येतील. विशेष म्हणजे राजकीय पक्ष या निवडणुकीत व्हिप जारी करू शकत नाहीत. कारण, मतदान गोपनीय पद्धतीने होते.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्या आणि नियुक्त सदस्यांना असतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवान यांना न्यायालयाच्या एका
निर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.
राज्यसभेत भाजपाला ‘बळ’
लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.