‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये उपराष्ट्रपतींचे भाषण; ६० देशांचे २००० प्रतिनिधी राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:28 AM2018-09-04T02:28:39+5:302018-09-04T02:28:49+5:30

शिकागोतील वर्ल्ड हिंदू काँग्रेसची परिषद या आठवड्याच्या अखेरीस सुरू होत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती स्तराची व्यक्ती प्रथमच त्यात सहभागी होत आहे.

Vice President's speech in 'World Hindu Congress'; 60 countries will have 2,000 representatives present | ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये उपराष्ट्रपतींचे भाषण; ६० देशांचे २००० प्रतिनिधी राहणार उपस्थित

‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये उपराष्ट्रपतींचे भाषण; ६० देशांचे २००० प्रतिनिधी राहणार उपस्थित

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : शिकागोतील वर्ल्ड हिंदू काँग्रेसची परिषद या आठवड्याच्या अखेरीस सुरू होत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती स्तराची व्यक्ती प्रथमच त्यात सहभागी होत आहे.
वर्ल्ड हिंदू काँग्रेस ७ सप्टेंबरपासून तीन दिवस चालेले. स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये वर्ल्ड काँग्रेसला संबोधित केल्याच्या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रथमच भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
९ सप्टेंबर रोजी ६० देशांचे २००० प्रतिनिधी हजर राहणार असून यात नायडू यांचाही समावेश आहे. उपराष्ट्रपतींचे भाषण भारत आणि इतरत्र टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून या दौऱ्याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने ‘लोकमत’ला दुजोरा दिला. परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमुळे वर्ल्ड काँग्रैसला जाणे रद्द केले. गडकरी म्हणाले की, मी हजर राहणार होतो. मात्र, महत्त्वाच्या कामांमुळे हा दौरा रद्द केला. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे परिषदेस उपस्थित राहू शकतात. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संयुक्त महासचिव दत्तात्रय होसबळे यांचीही तिथे भाषणे होणार आहेत.

हेही मांडणार विचार
‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’चे आयोजन दर चार वर्षांनी एकदा होते. जगभरात काम करणाºया हिंदू संघटनांचा हा एक समूह आहे. दलाई लामा, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद हेही प्रमुख वक्त्यांपैकी एक असतील.

Web Title: Vice President's speech in 'World Hindu Congress'; 60 countries will have 2,000 representatives present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.