धुक्याचे बळी! धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 07:55 AM2018-01-07T07:55:13+5:302018-01-07T09:45:19+5:30
दिल्लीतील सिंधू बॉर्डर परिसरात धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार पॉवरलिफ्टर्सचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या धुक्यामुळे रस्तेवाहतुकीवरही विपरित परिणाम झाला असून, दिल्लीतील सिंधू बॉर्डर परिसरात धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये चार पॉवरलिफ्टर्सचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
#CORRECTION Four powerlifting players killed & two were injured in a road accident due to fog conditions at Sindhu border in #Delhi and not weightlifting players as reported earlier
— ANI (@ANI) January 7, 2018
दिल्ली-चंदीगड महामार्गावरील सिंधू बॉर्डर येथे हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कारची डिव्हायडर आणि खांबाला धडक बसली. त्यामुळे चार खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्याबरोबरच दाट धुकेही पडत आहे. रस्त्यांवर प्रचंड धुके असल्याने वाहने पुढे सरकण्यात अडथळे निर्माण होत आहे. परिणामी दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच हरयाणा व पंजाबमध्ये वाहतूक मंद गतीने सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे.
Fog continues to blanket Delhi #Visuals from near AIIMS pic.twitter.com/E8QWZXxzTC
— ANI (@ANI) January 7, 2018