अस्वच्छतेने घेतला पाच वर्षाच्या बालकाचा बळी
By Admin | Published: August 15, 2016 12:50 AM2016-08-15T00:50:48+5:302016-08-15T00:50:48+5:30
जळगाव: शहरातील भिलपुरा येथे मामाकडे आलेल्या रेहान खान नसीर खान (वय ५ रा.मेहकर, जि.बुलढाणा) या बालकाचा डेंग्युसदृष्य आजाराने शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भिलपुरा परिसरात प्रचंड अस्वच्छता असून त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहेे, रेहान या अस्वच्छेताच बळी ठरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
ज गाव: शहरातील भिलपुरा येथे मामाकडे आलेल्या रेहान खान नसीर खान (वय ५ रा.मेहकर, जि.बुलढाणा) या बालकाचा डेंग्युसदृष्य आजाराने शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भिलपुरा परिसरात प्रचंड अस्वच्छता असून त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहेे, रेहान या अस्वच्छेताच बळी ठरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.शुक्रवारी रेहान याला अचानक चक्कर आल्याने तो जमीनीवर कोसळला. त्याला तातडीने परिसरातील डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर शनिवारी चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे रक्ताच्या तपासण्या केल्या असता शरीरातील प्लेटलेटस् कमी झालेल्या होत्या तर नाकातून रक्तस्त्राव होत होता.प्राथमिक तपासणीत डेंग्युसदृष्य लक्षणे दिसून येत होती. नंतर दुसर्यांचा त्याची तपासणी करण्यात आली, मात्र अहवाल येण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली.रविवारी रेहानवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहकर येथून आईसोबत तो मामाच्या गावाला आला होता.खूनाचा गुन्हा दाखल करारेहान याच्या मृत्यूला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करुन प्रशासनावर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष अयाज अली नियाज अली यांनी केली आहे. मंगळवारी मनपा आयुक्तांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. भिलपुरा परिसरात साफसफाई केली जात नाही, त्यामुळे डासांची संख्या वाढली आहे.कोट..बालकाला डेंग्यु झाल्याचा अहवाल नाही, मात्र लक्षणे डेंग्युसदृष्य होती. प्लेटलेटस् कमी झाल्या होत्या व नाकातून रक्त येत होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली होती.-डॉ.सतीष चौधरी, चिरायु हॉस्पिटल