नोटाबंदीच्या यज्ञात शेतकऱ्यांचा बळी - राहुल गांधींचा घणाघात

By admin | Published: December 26, 2016 08:04 PM2016-12-26T20:04:30+5:302016-12-26T20:04:53+5:30

नोटाबंदीविरोधात सराकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी या मुदद्यावरून केंद्र सरकारला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला.

Victims of Nalchanti Yagna sacrificed - Rahul Gandhi's dizziness | नोटाबंदीच्या यज्ञात शेतकऱ्यांचा बळी - राहुल गांधींचा घणाघात

नोटाबंदीच्या यज्ञात शेतकऱ्यांचा बळी - राहुल गांधींचा घणाघात

Next
ऑनलाइन लोकमत
 बारां, (राजस्थान), दि. 26 -  नोटाबंदीविरोधात सराकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी  या मुदद्यावरून केंद्र सरकारला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. राजस्थान येथील बारां येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या यज्ञात मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला, असा सनसनाटी आरोप केला. नोटाबंदीचा निर्णय हा गरीब, शेतकरी आणि मजुरांच्याविरोधात घेण्यात आला होता. 99 रोख रक्कम जी भारतीयांजवळ आहे ती काळा पैसा नसल्याचेही राहुल गांधी म्हणात.
स्विस सरकारकडून सरकारला स्वीस बँकेतील खातेधारकांची नावे मिळाली होती. मोदींनी अद्याप ती जाहीर केली नाहीत. ती कधी करणार. सध्या पेटीएमवरून ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगण्यात येत आहे. पण पेटीएम म्हणजे मोदींना पैसे द्या, असाच त्याचा अर्थ होतो.  99 टक्के रोख रक्कम जी देशवासियांकडे आहे ती काळा पैसा नाही. तसेच शेतकऱ्यांकडे मोदी सरकार आणि वसुंधरा सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 
 

Web Title: Victims of Nalchanti Yagna sacrificed - Rahul Gandhi's dizziness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.