पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांनी दिलेले व्हिक्टोरिया क्रास पदक सापडले
By Admin | Published: August 13, 2016 07:36 PM2016-08-13T19:36:53+5:302016-08-13T19:54:35+5:30
तेलंगणात इमारतीच्या बांधकामाचे खोदकाम करीत असताना धाबा येथील भिकारू जुनघरे या तरुणास व्हिक्टोरिया क्रास पदक सापडले आहे
>- आकाश चौधरी / ऑनलाइन लोकमत
तेलंगणात खोदकाम करताना आढळले पदक
व्हिक्टोरिया क्रास पदक केवळ इंग्लंड व दिल्लीच्या म्युझियमध्येच आढळते
गोंडपिपरी, दि. 13 - पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटीशांकडून युद्धात उडी घेतली. या युद्धात लाखोंच्या संख्येत जीवित हानी झाली. युद्धात पराक्रम गाजविणाºया मोजक्या सैनिकांना ब्रिटीशांनी व्हिक्टोरिया क्रास पदक देवून गौरव केला होता. हे व्हिक्टोरिया पदक सध्या इंग्लंड व दिल्ली येथील संग्राहलयात पहायला मिळते. तेलंगणात इमारतीच्या बांधकामाचे खोदकाम करीत असताना धाबा येथील भिकारू जुनघरे या तरुणास हे पदक तीन वर्षांपूर्वी सापडले. आजही ते त्यांनी अतिशय जपून ठेवले आहे.
गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणाची सीमा लागून आहे. तालुक्यातील नागरिक मजुरीच्या शोधात तेलंगणाला जात असतात. धाबा येथील भिकारू जुनघरे हा तरुण तीन वर्षापूर्वी तेलंगणातील शाळेच्या इमारतीचा पायवा खोदण्यासाठी गेला. खोदकाम करीत असताना भिकारूला पदकासारखी पितळेची वस्तू मिळाली. पदक स्टारच्या आकाराचे असून वर ब्रिटीशांची टोपी व मध्यभागी एकमेकाला छेदणाºया तलवारी कोरल्या आहेत. त्यात सन १९१४-१५ असे लिहिले आहे. पदकाच्या खालच्या भागावर लहान अक्षरात इंग्रजी भाषेत ‘व्ही’ व मोठ्या अक्षरात ‘सी’ कोरलेले आहे. इंटरनेटवर १९१४-१५ हा कालखंड लिहून सर्च केले असता पहिल्या महायुद्धात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाºया यौद्धांना देण्यात येणारे व्हिक्टोरिया क्रास नावाचे हे पदक असल्याचे भिकारूच्या लक्षात आले. हे अतिशय दुर्मिळ असल्याचे लक्षात आल्यावर भिकारू जुनघरे या तरुणाने मागील तीन वर्षापासून पदकाला जपून ठेवले आहे.
पदक सोवर मकसुद अली खानचे
पदकाच्या मागच्या बाजूला सोवर मक्सुद अल्ली खान असे नाव कोरलेले आहे. त्या खाली नं. २३७५३०/सीसीआरएस असे कोरले आहे. त्यामुळे हे पदक सोवर मक्सुद अली खान नावाच्या जवानाचे असल्याचे तर्क काढले जात आहे. भिकारू जुनघरे याने कागजनगर परिसरात सोवर मक्सुद अली या नावाने शोधाशोध केली. मात्र त्या नावाचा कोणीही आढळला नाही. त्यामुळे त्यांनी ते पदक जपून ठेवले आहे.