Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:49 PM2023-04-16T13:49:24+5:302023-04-16T13:51:50+5:30

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात ही घटना घडली, तिथे लावलेल्या CCTV मध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली.

Video: 10-12 dogs attack, 65-year-old man dies on the spot in AMU UP | Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा...

Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा...

googlenewsNext


Dog Attack :उत्तर प्रदेशातीलअलीगढ मुस्लिम विद्यापीठात एका 65 वर्षीय व्यक्तीचा 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले सफदर अली यांचा जागीच मृत्यू झआला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तिथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना AMU कॅम्पसमध्ये घडली. सिव्हिल लाइनमधील रहिवासी सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फिरत होते. यावेली अचानक 10 ते 12 कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी त्यांचे शरीर फाडले. या घटनेत सफदर यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर सफदर यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोकांनी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सफदरचा मृत्यू कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे समजले. एसपी कुलदीप गुणवत यांनी सांगितले की, सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल.

Web Title: Video: 10-12 dogs attack, 65-year-old man dies on the spot in AMU UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.