VIDEO: स्विमिंग पूलमधून बाहेर पडला अन् कोसळला; १५ वर्षीय मुलाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 02:51 PM2024-06-22T14:51:55+5:302024-06-22T15:28:38+5:30
उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा स्विमिंग पूलमधून बाहेर पडताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
Shocking News : उत्तर प्रदेशात एका १५ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. स्विमिंग पूलमधून बाहेर पडताच अल्पवयीन मुलगा खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हा सगळा धक्कादायक प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
मृत अल्पवयीन मुलगा हा मेरठच्या शिवलखास परिसरातील रहिवासी होता. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होतं. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. २१ जून रोजी ही दुर्दैवी घटना घडली आहे. स्विमिंग पूलजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये मृत मुलगा तलावातून बाहेर पडून काही अंतर चालत असताना पाठीवर जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. मुलाला पडल्याचे पाहून आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी धावले. तिथल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
दुपारच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. पीडित मुलगा दिवसाच्या सुरुवातीला क्रिकेट खेळायचा आणि नंतर घरी परतायचा. त्या दिवशी देखील घरी परतल्यानंतर काही वेळातच तो आपल्या मित्रांसह स्विमिंग पूलकडे निघाला. मात्र पूलमधून बाहेर पडताच मुलाला मृत्यूने गाठलं. या घटनेनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Meerut: Young man dies immediately after coming out of swimming pool, incident captured on CCTV#meerut | #SwimmingPool | #Swimming | #UttarPradeshpic.twitter.com/6C3A3Ahwqt
— Siraj Noorani (@sirajnoorani) June 21, 2024
"पूलमध्ये काही मुले होती. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की एक मुलगा पूलमधून बाहेर येतो, थोडा चालतो आणि नंतर जमिनीवर पडतो. त्याला रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला घोषित केले, कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. पोलीस आपल्या बाजूने तपास करत असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिक्षक कमलेश बहादूर यांनी सांगितले.