video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 02:37 PM2024-11-26T14:37:07+5:302024-11-26T14:38:34+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh : पुराच्या पाण्यामुळे अनेकदा गावात मगरी शिरल्याच्या घटना घडतात. तुम्ही अशाप्रकारच्या अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पण, या घटनेत थोडा 'ट्विस्ट' आहे. हमीरपूर जिल्ह्यातील पोथिया गावात अजस्त्र मगरीला पकडण्यात आले. यानंतर एका तरुणाने चक्क त्या 20 फूट लांब अन् दीड क्विंटल वजनी मगरीला खांद्यावर घेऊन नदीपर्यंत सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूरच्या लालपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पोथिया गावातील जुन्या तलावात गेल्या महिन्याभरापासून मोठी मगर दिसत होती. मगरीला पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. लोकांनी या तलावाभोवती फिरणेही बंद केले होते. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून मगरीला पकडण्यासाठी पिंजरे लावली. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला जेरबंद केले.
ये है बुंदेलखंडियों की ताकत💪💪😳
— Rohit Tripathi journalist (@rohitt_tripathi) November 26, 2024
देशी खाना, देशी रहना ।#हमीरपुर के बाहुबली को देखिए लगभग 300Kg के विशालकाय मगरमच्छ को कंधों पर ले जाता ये युवक, दर्शल गांव के एक तालाब में ये मगरमच्छ काफी दिनों से था जिससे गांव में दहशत थी तालाब का पानी खाली करवाने के बाद वन विभाग की टीम ने… pic.twitter.com/ME8zcwQys4
यानंतर मगरीला दोरीने बांधून वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याने तिला चक्क मगरीला खांद्यावर घेतले अन् यमुना नदीत सोडले. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक या धाडसी कृत्याचे कौतुक करत आहेत.