VIDEO : रईस-2 मध्ये अखिलेश, डिंपल, मोदी
By admin | Published: February 7, 2017 10:20 AM2017-02-07T10:20:07+5:302017-02-07T10:29:21+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवदेखील 'रईस'मधील डायलॉग बोलताना दिसत आहेत.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 7 - बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा 'रईस' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर गाजवत आहे. सिनेमातील त्याचे डायलॉग गल्लोगल्ली लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. केवळ त्याचे चाहतेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवदेखील 'रईस'मधील डायलॉग बोलताना दिसत आहेत. आता निवडणुकीचे वातावरण असल्याने अर्थात अखिलेश यांचे डायलॉगही निवडणुकीचेच आहेत. त्याचे झाले असे की, अॅनिमेटर फैजान सिद्दकीने 'रईस' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बदल करत त्यात शाहरुखऐवजी अखिलेश यादव यांना दाखवले आहे.
शिवाय या ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिसत आहेत. विविध माध्यमांद्वारे घेतलेल्या दृश्यांच्या सहाय्याने अखिलेश, त्यांची पत्नी डिंपल, पंतप्रधान मोदी, काका शिवपाल यादव आणि अन्य लोकांचा या ट्रेलरमध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील या 'रईस'चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच 'दंगल' करत आहे. 2.45 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला शाहरुखच्या आवाजातील संवादात अखिलेश दिसत आहे. यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजातील संवादांवर पंतप्रधान मोदी यांना बोलताना दाखवण्यात आले आहे.
सोशल मीडिया हा मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आतापर्यंत 2.5 लाख लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओमध्ये मोदी अखिलेश यांना सांगताहेत, 'ज्यादा ऊंचा मत उड़, कट जाएगा'. यावर अखिलेश उत्तर देतात की, 'अगर कटने का डर होता, तो पतंग नहीं चढ़ाता, फिरकी पकड़ता.' उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या व्हिडीओद्वारे फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून नेतेमंडळींना एकमेकांवर हल्ला करताना दाखवण्यात आले आहे.
नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजातील डायलॉगमध्ये मोदी अखिलेश यांना सांगत आहेत, 'जिसको तू धंधा बोलता है न वो क्राइम है, इसको बंद कर दे वर्ना सांस लेना मुश्किल कर दूंगा.' यावर अखिलेश म्हणतात, 'मेरी सांस तो रोक लोगे, लेकिन इस हवा को कैसे रोकोगे'. आणि यावेळी ट्रेलरमध्ये एन्ट्री होते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसशी झालेल्या युतीचे यावेळी दृश्य दाखवण्यात आले आहे.
यात अखिलेश यांची पत्नी डिंपलदेखील पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. 'रईस'च्या या ट्रेलरमध्ये बदल केलेल्या व्हिडीओबाबत फैजानने सांगितले की, मी रईस सिनेमा पाहिल्यानंतर असे लक्षात आले की आताच्या राजकीय घडामोडींमध्येही अशाच प्रकारेच डायलॉग ऐकायला मिळत आहेत. यावेळी विचार आला की याचा वापर उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी केला जाऊ शकतो'. दरम्यान, उत्तर प्रदेशातील रईसचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.