VIDEO : खिलाडी अक्षय कुमारने जवानांना दिल्या 'दिवाळीच्या शुभेच्छा'
By admin | Published: October 25, 2016 12:13 PM2016-10-25T12:13:40+5:302016-10-25T12:32:41+5:30
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - दिवाळीच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासीयांना केल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडीओद्वारे त्याने जवानांप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त करत, उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजलीदेखील वाहिली आहे. तसेच, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करायचे की नाही यावर केवळ चर्चा करणा-यांनाही अक्षयने चांगलेच फटकारले आहे.
सण-उत्सव आपल्या माणसांसोबत साजरे करण्याचे आनंदाचे क्षण आम्ही तुमच्यामुळे अनुभवत आहोत, असे सांगत अक्षयने जवानांचे आभार मानले आहेत. शिवाय सीमारेषेवर शत्रूंशी लढून देशाचे संरक्षण करणा-या जवानांप्रती त्याने कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. या व्हिडीओद्वारे त्याने भारतवासीयांनाही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी आवाहन केले आहे. अक्षय कुमारप्रमाणे अभिनेता सलमान खान आणि आमीर खाननेही जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' दिल्या आहेत.
आणखी बातम्या
Ur one wish can be the reason for a lot of smiles this Diwali.Send ur #Sandesh2Soldiers now via https://t.co/bUEI7AuMQc or Narendra Modi app pic.twitter.com/HNJjFAyOpZ
— Akshay Kumar (@akshaykumar) October 24, 2016
देश के सेना के जवानो और नवजनो को मेरी तरफ से दीवाली की हार्दिक शुभ कामनाए और सभी को हॅपी दीवाली #Sandesh2Soldiers . https://t.co/w754mw9hDn
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 24, 2016
सीमेवरील तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' पाठवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ट्विटरवर #Sandesh2Soldiers या नावाने एक हॅशटॅग बनवण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील अनेक सेलिब्रिटींसह अनेक जणांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.