VIDEO : ... अन् उद्घाटनप्रसंगी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी अधिका-यांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 04:58 PM2018-02-22T16:58:04+5:302018-02-22T17:04:15+5:30
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नते आणि खासदार मुरली मनोहर जोशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. यावेळी त्यांनी कानपूरमधील सरकारी अधिका-यांवर संताप व्यक्त करताना दिसून आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोलार लाइट पॅनलचे उद्धाटन मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येथील अधिका-यांवर राग व्यक्त केला.
कानपूर : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नते आणि खासदार मुरली मनोहर जोशी अनेकदा कोणत्या-ना-कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असतात. यावेळी ते कानपूरमधील सरकारी अधिका-यांवर भडकल्यामुळे चर्चेत आले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका सोलार लाइट पॅनलचे उद्धाटन मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येथील अधिका-यांवर राग व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलार लाइट पॅनलच्या उद्घाटनप्रसंगी लालफित कापण्यासाठी त्याठिकाणी कात्री नव्हती. त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी लालफित हाताने तोडली. यानंतर एका अधिका-यांने कात्री आणली असता, त्याच्यावर ओरडले आणि म्हणाले, आता उद्धाटन झाले आहे. कात्रीचा काय उपयोग होणार नाही. किती उद्धट माणूस आहेस तू.. अशा शब्दांत त्याला झापले. तसेच, उपस्थित अधिका-यांना विचारले की, येथील व्यवस्थापक कोण आहे. तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ना? असा सवाल करत अधिका-यांवर आगपाखड केली.
#WATCH Senior BJP leader and MP Dr.Murli Manohar Joshi scolds official after no scissors were there for cutting of ribbon during inauguration of a solar light panel in Kanpur Collectorate pic.twitter.com/wB39B4sSLw
— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2018
दरम्यान, याआधी सुद्धा मुरली मनोहर जोशी अनेकदा सरकारी अधिका-यांवर ओरडताना दिसून आले आहेत. सध्या ते कानपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. तसेच, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद भूषविले होते.