VIDEO - सर्जिकल स्ट्राईकनंतरची दुसरी मोठी कारवाई, पाकला जबर दणका
By admin | Published: May 23, 2017 04:40 PM2017-05-23T16:40:31+5:302017-05-23T17:16:03+5:30
सर्जिकल स्ट्राईकनंतरची दुसरी मोठी कारवाई करताना भारतीय लष्कराने पाकिस्तानला जबर दणका दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - सर्जिकल स्ट्राईकनंतरची दुसरी मोठी कारवाई करताना भारतीय लष्कराने पाकिस्तानला जबर दणका दिला आहे. गोळीला गोळीने उत्तर देण्याचे आपले धोरण बाजूला ठेवत भारतीय लष्कराने गोळीला तोफगोळयाच्या वर्षावाने उत्तर दिले. घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी सैन्यावर जरब बसवण्यासाठी लष्कराने घातक हत्याराचा उपयोग केला.
एकापाठोपाठ एक स्फोट घडवून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्यात 10 ते 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा अंदाज सुरक्षातज्ञांनी व्यक्त केला आहे. 20 आणि 21 मे रोजी केलेल्या या कारवाईची माहिती लष्कराने पत्रकारपरिषद घेऊन दिली.
आणखी वाचा
यापूर्वी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताच्या पॅरा कमांडोंनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते तसेच त्यांचे तळही नष्ट केले होते. त्यानंतरही ही मोठी कारवाई समजली जात आहे. 1 मे रोजी पाकिस्तानी कमांडोंनी गस्तीवर असणा-या भारतीय जवानांवर हल्ला करुन त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या त्या नापाक हरकतीचा हा बदला आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता नाही. भारतात राहूनही पाकिस्तानला नेस्तनाबूत करता येते हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
काय म्हणाले कर्नल वीएन थापर
कर्नल वीएन थापर यांनी सैन्याच्या या आक्रमक भूमिकेला योग्य ठरवले आहे. यापूर्वीच अशी कारवाई व्हायला हवी होती. पाकिस्तानला जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत अशी कारवाई करावीच लागेल. भारताला पुढाकार घेऊन अशी कारवाई करावी लागेल. लष्कर पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला उत्तर द्यायला सक्षम आहे. हा फक्त एक छोटासा संदेश आहे.
काय केले भारताने
सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरले अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देताना कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला.
#WATCH Pakistani posts destroyed by Indian Army in Nowshera (Jammu and Kashmir) pic.twitter.com/whrWb0wMfg
— ANI (@ANI_news) May 23, 2017