VIDEO - अजब ! गाडी नाही रस्ता वाजवणार हॉर्न

By admin | Published: April 27, 2017 08:50 AM2017-04-27T08:50:34+5:302017-04-27T09:01:21+5:30

नव्या तंत्रानुसार रस्ते स्वत: हॉर्न वाजवून वाहनचालकांना त्यांचा वेग कमी करण्याचा इशारा देतील

VIDEO - Awesome! The train will not blow the road | VIDEO - अजब ! गाडी नाही रस्ता वाजवणार हॉर्न

VIDEO - अजब ! गाडी नाही रस्ता वाजवणार हॉर्न

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रस्त्यांवरुन आणि त्यातही खासकरुन हायवेंवर बेदरकारपणे वाहने चालवली जातात. यावेळी अनेकदा वाहनचालक दुस-या गाडीला ओव्हरटेक करताना किंवा वळणावर हॉर्न देत नाहीत, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप असते. पण अशावेळी जर रस्त्यानेच तुम्हाला हॉर्न वाजवून अलर्ट केलं तर...हे कसं काय शक्य आहे असा विचार करत असाल तर तुमच्या माहितीसाठी एचपी लुब्रिकंट्स आणि लिओ बर्निट यांनी हात मिळवत एक तंत्र विकसित केलं आहे. या नव्या तंत्रानुसार रस्ते स्वत: हॉर्न वाजवून वाहनचालकांना त्यांचा वेग कमी करण्याचा इशारा देतील. 
 
महामार्गांवरील होणारे अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने हे तंत्र विकसित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा महामार्ग एनएच 1 वर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरला जोडणारा हा महामार्ग अत्यंत धोकादायक मानला जातो. या नव्या तंत्रानुसार रस्त्यांवरील वळणावर स्मार्टलाइफ खांब उभारले जातात. हे सर्व खांब एकमेकांशी जोडलेले असतात. 
 
हे खांब वाहनाचा वेग मोजतात आणि लगेच हॉर्न वाजवून वाहनचालकाला अलर्ट करतात. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तंत्र वापरण्यात आल्यापासून अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. या तंत्राचं व्यवस्थित निरीक्षण केलं जात असून अन्य महत्वाच्या ठिकाणी याचा वापर करण्यासंबंधी विचार केला जात आहे. 
 
सर्वात जास्त अपघात होणा-या देशांच्या यादीत भारतही आहे. खासकरुन डोंगराळ भागात जिथे वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जात नाही तिथे अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. सरकारी आकडेवारीनुसार फक्त 2015 मध्ये एकूण 1 लाख 40 हजार लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. 
 

Web Title: VIDEO - Awesome! The train will not blow the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.