Video: काश्मीरमध्ये अमित शहांच्या भाषणावेळी सुरू झाली अजान, गृहमंत्र्यांनी केलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:52 AM2022-10-06T09:52:32+5:302022-10-06T09:55:52+5:30
अमित शहा यांचा बारामुल्ला येथील भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
देशात दसरा सणाचा उत्सव असताना महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्याची उत्सुकता सर्वांना लागली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दुसरीकडे भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी बारामुल्ला येथे भाषण केले. शहा यांच्या सभेतील भाषणावेळी अजान सुरू होताच, गृहमंत्र्यांनी आपलं भाषण काही वेळ थांबवलं. त्यामुळे, उपस्थितांना टाळ्या वाजवून शहांच्या कृतीचे स्वागत केले.
अमित शहा यांचा बारामुल्ला येथील भाषणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील शौकत अली स्टेडियममध्ये अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच मशिदीतून अजानचा आवाज येऊ लागला. शाह यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना “मशिदीत काही सुरु आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर त्यांना अजान सुरु असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अमित शाह यांनी आपलं भाषण थांबवलं. विशेष म्हणजे अजान संपल्यानंतर लोकांना विचारुनच त्यांनी आपलं भाषण सुरू केलं.
जम्मू काश्मीरमधील सभेदरम्यान अजान ऐकताच अमित शाह यांनी थांबवलं भाषण, लोकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक #AmitShah#JammuAndKashmir#Baramulla@BJP4India@AmitShahOffice@AmitShahpic.twitter.com/GK0SX8gfbc
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) October 6, 2022
अजान संपल्यानंतर शहांनी लोकांना विचारलं की, जवळच्या मशिदीत प्रार्थना सुरू होणार असल्याचं मला समजलं होतं. त्यामुळे, मी भाषण थांबवलं. आता प्रार्थना संपली आहे. माझं भाषण सुरू करू का? असा प्रश्न केला. त्यावेळी, उपस्थितांना टाळ्या वाजवून अमित शहांच्या कृतीचं कौतुक केला. त्यानंतर, शहांनी भाषणाला सुरुवात केली. सध्या गृहमंत्र्यांचा या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.