Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:05 PM2022-04-19T12:05:08+5:302022-04-19T12:09:11+5:30

BJP Gulabchand Katarias : रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Video BJP Gulabchand Katarias controversial statement on sitas abduction ravana did not | Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

Video - "रावणाने सीतेचे अपहरण करुन मोठा गुन्हा केला नाही"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

Next

नवी दिल्ली - राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand Kataria) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता त्यांनी बोहेडा येथील एका कार्यक्रमात आणखी एक मोठं वादग्रस्त विधान केलं आहे. "रावणाने सीतेचे अपहरण करुन कोणता मोठा गुन्हा केला नाही. कारण रावणाने सीतेला स्पर्श केला नव्हता" असं  म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून राजस्थानमध्येराजकारण तापलं आहे. 

उदयपूर जिल्ह्यातील वल्लभनगर विधानसभेचे माजी आमदार रणधीर सिंह भींडर (Randhir Singh Bhindar) यांनी एक व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कटारियाच्या मते रावण खूप सिद्धांतिक व्यक्ती होता. त्याने काही मोठा गुन्हा केला नाही असं म्हटलं आहे. तसेच भाजपा नेत्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सीतेचे अपहरण एक सामान्य विषय होता. जर रावणाने सीतेला स्पर्श केला असता तर तो गुन्हा झाला असता" असं कटारिया यांनी म्हटलं होतं. 

कटारियांच्या मते जर कुणाच्या पत्नीचे अपहरण करुन स्पर्श केला नाही तर तो गुन्हा नाही, या शब्दात रणधीर सिंह यांनी कटारिया यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसेच जर रावणाने कोणताच गुन्हा केला नाही तर कटारिया संपूर्ण रामायण खोटे आहे, असे सिद्ध करत आहेत, जेव्हा की भगवान राम यांचा जन्म रावण या राक्षसाचा वध करण्यासाठीच झाला होता असंही म्हटलं आहे.

रणधीर सिंह भीडर यांनी कटारिया यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत म्हटलं की, "कटारिया हे रावणाचेच अनुयायी आहेत. यामुळेच भगवान राम, महाराणा प्रताप आणि आपल्या इतिहास याबाबत बोलत राहतात. व्यक्तीचे बोलणेच त्याचे चरित्र कसे आहे, हे दाखवते. आता आम्हाला समजायला लागले आहे की, ते हिंदू आणि मेवाडी नाही तर श्रीलंकेतून आले आहेत. त्यांना त्यांचा आदर्श पुरुष रावणाला भेटण्यासाठी तिथेच पाठवून द्यायला हवे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video BJP Gulabchand Katarias controversial statement on sitas abduction ravana did not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.