Video : भाजपा मंत्र्यांचं वादळी विधान, पाऊस मागे-पुढे करणारं अॅप येतंय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:29 PM2021-08-31T19:29:28+5:302021-08-31T19:32:27+5:30
Video : उत्तराखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह राव यांच एक विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पावसासंदर्भात माहिती देताना, मंत्रीमहोदयांनी एका अॅपबद्दल सांगितलं आहे.
देहरादून - देवभूमी असलेल्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या उत्तराखंडमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृष्टी होते. उत्तराखंडच्या मुसळधार पावसाची देशभर चर्चा होत असते. कारण, अनेकदा हा पाऊस मोठ्या प्रमाणात साधनसंपत्तीचं नुकसान करतो. येथील महापुरात अनेकदा जीवितहानी होते. त्यामुळे, येथील पावसापूर्वी हवामान खात्याचे अलर्ट आणि पूर्वउपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. यासंदर्भात येथील आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह रावत यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
उत्तराखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह राव यांच एक विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पावसासंदर्भात माहिती देताना, मंत्रीमहोदयांनी एका अॅपबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये, पावसाला कमी-जास्त किंवा पुढे-मागे नेता येतं, असे रावत यांनी म्हटलं आहे. रावत यांच्या व्हिडिओवरुन त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. तसेच, याप्रकारचे कुठलेही अॅप बनने शक्य नसल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत.
Any app which can help share sanity & intellect? Sharing is caring!
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) August 30, 2021
BJP Senior leader & Minister in Uttarakhand, Dhan Singh Rawat says he can control rainfall via an app & send rains to other states experiencing lesser rainfall. pic.twitter.com/ADsQJOEGrH
पावसाची तीव्रता सांगणारा, हवामान खात्याचा अंदाज देणारं किंवा माहिती देणारं अॅप अस्तित्वात आहे. पण, पावसाची दिशी बदलण्याचं आणि पावसाची तीव्रता कमी करण्याचं अॅप नाही, असेही अनेकानी म्हटलं आहे. भाजप नेत्यांच्या या विधानावरुन त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे.