Video : भाजपा मंत्र्याची निवडणूक अधिकाऱ्याशी हुज्जत, हेलिकॉप्टर तपासूच दिलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:21 AM2019-04-19T10:21:22+5:302019-04-19T10:22:36+5:30
मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर, आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यास प्रधान यांनी अर्वाच्य भाषेत दटावले. धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यास आलेल्या पथकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांशी ते वाद घालतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी, प्रधान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागितली. तसेच या पथकातील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. विशेष म्हणजे, प्रधान यांच्या अशा वागण्यामुळे अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली, नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्याही हेलिकॉप्टरवर भरारी पथकाने धाड टाकली आहे. त्यामध्ये पटनाईक यांनी भररी पथकाला संपूर्ण सहकार्य करत, हेलिकॉप्टरची तपासणी करू दिली. राऊरकेला येथे पटनाईक येथील निवडणूक रॅलीदरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान, ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती.
Please watch the arrogance of BJP leader and Union Minister Dharmendra Pradhan. The way he threatens and rebukes Officers on Election Commission work and stops them from checking his sealed suitcase which is rumored to be carrying.....? pic.twitter.com/xnXb5v2CL6
— Dr. Sasmit Patra (@sasmitpatra) April 17, 2019