Video - लग्नासाठी काय पण! परिसराला पुराचा वेढा पण मागे नाही हटले, बोटीने नवरदेवाचे घर गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 09:12 AM2022-07-17T09:12:50+5:302022-07-17T09:18:35+5:30
Video - पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आंध्र प्रदेशमध्येही पूरामुळे लोक हैराण झाले आहेत. कोनासीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एक व्हिडीओ समोर आला आहे. पुराने वेढलेल्या भागात बोटीच्या सहाय्याने एका नवरीने आपल्या कुटुंबासह नवदेवाचे घर गाठल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे कोनसीमा जिल्ह्यातील पेडापट्टनमलंकामधील एका कुटुंबाने जुलैमध्ये आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. परिणामी लोकांना येण्या-जाण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता.
Fully decked up #BrideOnBoat, making her way to d groom's place along with family members: Prashanti & Ashok reportedly chose a date in July over August to have rain hassle-free wedding but a #TruantMonsoon left #AndhraPradesh's #Konaseema flooded #MonsoonWedding@ndtv@ndtvindiapic.twitter.com/iauxbSNIyQ
— Uma Sudhir (@umasudhir) July 15, 2022
पुढच्या महिन्यात पावसाची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जुलै महिन्यातच प्रशांतीचे लग्न करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. परंतु, पूर परिस्थितीमुळे वाहनांचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर बोटीच्या सहाय्याने प्रशांती आणि कुटुंबीयांनी नवरदेवाचे घर गाठत गाठले आणि दोघांचे लग्न लावण्यात आले. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.