VIDEO : चिनूकने दाखवली शक्तीची चुणूक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर थेट उचलून नेले
By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 01:52 PM2020-10-17T13:52:55+5:302020-10-17T14:02:01+5:30
Chinook helicopter News : जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले
केदारनाथ (उत्तराखंड) - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात असलेल्या चिनूक हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा आपल्या शक्तीची चुणूक दाखवली आहे. जगातले सर्वात ताकदवान चॉपर मानल्या जाणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अपघातग्रस्त झालेले हेलिकॉप्टर थेट उचलून नेले आहे.
२०१८ मध्ये केदारनाथमधील हेलिपॅडजवळ एका खांबाला आदळून हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातात लागलेल्या आगीत हे हेलिकॉप्टर जळाले होते. दरदम्यान, या हेलिकॉप्टरचा सांगाडा घटनास्थळावरच होता. अखेर दोन वर्षांनंतर चिनूकच्या मदतीने या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेण्यात यश मिळाले आहे.
Uttarakhand: A Chinook helicopter landed at the MI-17 helipad in Kedarnath today. The helicopter will carry back the debris of Indian Air Force's MI-17 helicopter that caught fire following a collision with an iron girder while landing at helipad near Kedarnath temple in 2018. pic.twitter.com/IbX3WcGXpJ
— ANI (@ANI) October 17, 2020
दरम्यान, चिनूक हेलिकॉप्टर एमआय-१७ हेलिकॉप्टरचा सांगाडा उचलून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून या हेलिकॉप्टरच्या शक्तीची कल्पना येऊ शकते. पाहा व्हिडीओ.
#WATCH: A Chinook helicopter takes off from a helipad in Kedarnath shrine with the debris of Indian Air Force's MI-17 helicopter which had met with an accident in 2018. pic.twitter.com/IzsjU6MVXZ
— ANI (@ANI) October 17, 2020
सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती. अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात.दरम्यान, दीड वर्षापूर्वी भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून या हेलिकॉप्टरचा वापर भारतीय हवाईदलाकडून उत्तर सीमेवर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
अशी आहेत चिनूकची वैशिष्ट्ये
अमेरिकन लष्कर जेव्हा युद्धावर असते तेव्हा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनूकचा वापर केला जातो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान चॉपर असल्याचे मानले जाते. चिनूक हेलिकॉप्टरची ताकद जगातल्या सर्वच देशांच्या लष्कराला परिचित आहे.