"पैशांसाठी आलो पण पैसे मिळालेच नाहीत"; योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांचा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:27 PM2021-10-07T14:27:06+5:302021-10-07T14:36:06+5:30

Video of CM Yogi Adityanath Program : योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही या कार्यक्रमात "पैशांसाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे मिळालेच नाहीत" असं म्हटलं आहे.

video of cm yogi adityanath during chandauli program is going viral on social media | "पैशांसाठी आलो पण पैसे मिळालेच नाहीत"; योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांचा 'तो' Video व्हायरल

"पैशांसाठी आलो पण पैसे मिळालेच नाहीत"; योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांचा 'तो' Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थित बुधवारी चंदौली जिल्ह्यातील काही प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली. मात्र, या कार्यक्रमाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही या कार्यक्रमात "पैशांसाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे मिळालेच नाहीत" असं म्हटलं आहे. या व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यामुळे योगींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पत्रकारांनी कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या गर्दीतील एका व्यक्तीला प्रश्न विचारला की "तुम्ही योगी आदित्यनाथ यांना ऐकायला आला होतात का?" त्यावर एका व्यक्तीने उत्तर दिलं की, "आम्हाला या जाहीर सभेत बोलावलं होतं. जबरदस्तीने बोलावलं गेलं होतं." त्यानंतर पत्रकाराने विचारले की, "तुम्ही कोणाच्या बाजूने आला होता” तर समोरील व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्ही रेशन विभागाच्यावतीने आलो आहोत."

पत्रकाराने विचारलं की, "तुम्ही इथे फक्त जबरदस्तीने आला होतात का? यामागे कोणतंही कारण नव्हतं का?" त्यावर दुसऱ्या एका व्यक्तीने उत्तर दिलं की, "आम्ही इथे पैसे घेण्यासाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे दिले गेले नाहीत". त्यावर पत्रकाराने पुन्हा विचारलं की, "तुम्हाला इथे येण्यासाठी काही पैसे मिळाले का?" या प्रश्नाला उत्तर देताना समोरील व्यक्तीने "काहीही दिलं गेलं नाही" असं म्हटलं आहे. 

"मला माहीत नाही, फक्त फोन करून बोलावून घेतलं"

जेव्हा या पत्रकाराने एका महिलेला तिचं कार्यक्रमाला येण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली "मला माहीत नाही, फक्त फोन करून बोलावून घेतलं." चंदौलीमधील या कार्यक्रमात बुधवारी योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी आज आपण सर्वांनी चंदौलीसाठी 800 कोटी प्रकल्पांची भेट आणली आहे असं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: video of cm yogi adityanath during chandauli program is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.