Video : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 08:50 PM2020-04-01T20:50:25+5:302020-04-01T20:53:27+5:30

CoronaVirus : आपण घरातून बाहेर न पडता १०० टक्के लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करण्यास साथ देणं गरजेचं आहे.

Video : CoronaVirus: You're doing a great job; MLA holds a police legs to show his gratitude pda | Video : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय

Video : CoronaVirus: तुम्ही खूप छान काम करताय; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदारानं धरले पोलिसांचे पाय

Next
ठळक मुद्देअरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसाचे पाय पकडून आभार व्यक्त केले आहेत.कोरोना युद्धाशी दिवसरात्र २४ लढत आहेत ते आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल.

हैदराबाद - कोरोनाच्या कहरामुळे भारताच्याच नाही तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र, कोरोना युद्धाशी दिवसरात्र २४ लढत आहेत ते आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल. पोलीस दलाचे आंध्र प्रदेशात तर एका आमदाराने चक्क पाय धरून कृतज्ञता व्यक्त केली आहे. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसाचे पाय पकडून आभार व्यक्त केले आहेत.

पोलीस आणि आरोग्य विभागावर कामाचा प्रचंड ताण आहे. पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होत असताना विशाखापट्टनम येथील एका आमदाराने चक्क पोलीस अधिकाऱ्यांचेच पाय धरले. कोरोनाच्या लढाईत सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे पाय धरले. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. पोलिसांना देखील आपल्याप्रमाणे कुटुंब आहे. तरीदेखील घर दार सोडून ते कोरोनाविरुद्धची लढाई हिम्मतीने लढत आहेत. त्यांना आपण घरातून बाहेर न पडता १०० टक्के लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करण्यास साथ देणं गरजेचं आहे.

देशातील  कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा विळखा आटोक्यात आणायचा असेल तर आपण पोलीस यंत्रणेला साहाय्य करून घरीच बसणं स्वीकारलं पाहिजे. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1,637 वर पोहोचली आहे. 

 

 

Web Title: Video : CoronaVirus: You're doing a great job; MLA holds a police legs to show his gratitude pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.