VIDEO : वाशिममध्ये उघड्यावर शौच करणा-यांना उठाबशांची शिक्षा
By Admin | Published: July 13, 2017 04:51 PM2017-07-13T16:51:08+5:302017-07-13T16:51:08+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 13 - शिरपूर जैन परिसरात मागील दोन दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणा-याविरोधात गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करण्याचा ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 13 - शिरपूर जैन परिसरात मागील दोन दिवसांपासून उघड्यावर शौचास जाणा-याविरोधात गुडमॉर्निंग पथकाने कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी (13 जुलै) सलग दुस-या दिवशी 17 जणांविरोधात कारवाई करण्यात आली. उघड्यावर शौचास जाणा-यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. उठाबशांची शिक्षा देऊन यानंतर उघड्यावर शौचास जाणार नाही, असे कबुल केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
प्रत्येक घरामध्ये शौचालय निर्माण करण्यासाठी शासनाने मागील तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्याचा परिणामही दिसत आहे. परंतु काही लोकांनी अद्यापही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही. त्यामुळे ते आजही उघड्यावर शौचास जातात. परिणामी गावात दुर्गंधी व घाण दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर, गुडमॉर्निंग पथकानं मागील दोन दिवसांपासून शिरपूर व परिसरात कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार १२ जुलै रोजी ५२ तर १३ जुलै रोजी शिरपूरात १७, किन्ही घोडमोडमध्ये ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शिरपुरातील १३ जणांना ५०० रुपये दंड तर ४ जणांना उठाबशा काढाव्या लागल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. ईस्कापे यांच्या मार्गदर्शनाखालील गुडमॉर्निंग पथकामध्ये जिल्हा समन्वयक पुष्पलता अफुने, सुखदेव पडघान, ग्रामविकास अधिकारी एन.ए.नवघरे, संजय बेंद्रे, चंदु पडघान, कैलास आदमने, पो.हे.कां. माणिक खानझोडे, पांडे, भुरकाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होते.
https://www.dailymotion.com/video/x8457lf