VIDEO: अधिका-यावर भडकले आझम खान, म्हणाले हे मोदींनी सांगितलं का
By admin | Published: March 16, 2017 12:09 PM2017-03-16T12:09:05+5:302017-03-16T12:09:05+5:30
आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा चर्चेत
Next
ऑनलाइन लोकमत
रामपूर , दि. 16 - आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं तरी आझम खान आणि त्यांचा मुलगा विजयी झाले. आपल्या विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी ते रामपूरमध्ये गेले असता तेथील अधिका-यावर चांगलेच भडकले. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आझम खान विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला जात असताना पाऊश पडत होता. त्यामुळे रस्त्यात चिखल झाला होता. त्यामुळे मतमोजणी कार्यालयात पोहोचण्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे गाडीतून उतरून ते चालत निघाले. चिखलाच्या रस्त्यावरून चालत जात ते प्रमाणपत्र घेण्यास पोहोचले आणि तेथे उपस्थित अधिका-यावर चांगलेच संतापले.
''प्रमाणपत्र अशाप्रकारे आणायचंय हे देखील मोदींनी सांगितलेलं का, प्रमाणपत्र मी नंतर घेईन, तुम्ही चला माझ्यासोबत त्या रस्त्यावर , चालून दाखवा त्या रस्त्यावर असं म्हणत त्यांनी खराब रस्त्यांसाठी समाजवादी पक्ष जबाबदार असल्याचंही मान्य केलं. आमच्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे, रस्त्यावर इतका चिखल असणं वाईट आहे. ही चांगली गोष्ट नक्कीच नाही...पण अजून सरकार आहे. अजून मी मंत्री आहे आणि नवी सरकार बनेपर्यंत मी मंत्री असेल. या दोन-तीन दिवसात तुमच्यावर कारवाई करण्याचा अधिकारही आहे माझ्याकडे.असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला 312 जागा, समाजवादी पक्षाला 47, बहुजन समाज पक्षाला 19 आणि कॉंग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला आहे.
Watch Azam Khan threatening an official for being made to walk thru muck in his own constituency.
— | nisheeth sharan | (@nisheethsharan) March 15, 2017
"YEH BHI MODI JI NE KAHA THA?" pic.twitter.com/KUDgkD0B9h