VIDEO - आकोटात नववारी फॅशन शो स्पर्धा
By Admin | Published: September 20, 2016 01:08 PM2016-09-20T13:08:09+5:302016-09-20T17:19:44+5:30
जेसीआय आकोट एंजल सिटीच्या समर्पण जेसी सप्ताहांतर्गत स्थानिक जलाराम मंदिराच्या सभागृहात ‘सखी संग ब्यूटी’ ह्या सौंदर्य कार्यशाळेत महिलांनी नऊवारी नेसून रॅम्पवॉक केला.
ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. २० - जेसीआय आकोट एंजल सिटीच्या समर्पण जेसी सप्ताहांतर्गत स्थानिक जलाराम मंदिराच्या सभागृहात ‘सखी संग ब्यूटी’ ह्या सौंदर्य कार्यशाळा पार पडली. यावेळी महिलांनी नववारी लुगडे नेसून, स्पर्धेमध्ये रॅम्पवर वॉक केला. . माया महल्ले ह्यांनी मेकअपचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह दाखविले. ‘सखी संग ब्यूटी’च्या प्रकल्पप्रमुख पुनम सेदाणी व सह प्रमुख सुनीता चायल होत्या. नववारी फॅशन शोमध्ये अकरा महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दर्शना पवार - प्रथम, मीरा भन्साले - द्वितीय तर शीतल पांडे - तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ह्या स्पर्धेचे परीक्षण वैशाली तट्टे व प्रा. बबिता हजारे यांनी केले. ह्या स्पर्धेच्या प्रकल्पप्रमुख मंजूषा टेमझरे व सहप्रमुख कविता गांधी होत्या. कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी अंबडकार ह्यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.