Video : 'हवेत' लग्नाचा घाट घालणं पडलं महागात; व्हायरल व्हिडिओनंतर डीजीसीएने दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:53 PM2021-05-24T18:53:42+5:302021-05-24T19:31:53+5:30
DGCA orders inquiry after viral video : एअरलाईनला ज्यांनी या विवाहसोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ फसला त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील रुग्ण संख्या वाढली आहे आणि त्यामुळे अनेक राज्यांची पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले आहेत. त्यात लग्नसमारंभातली फक्त मोजक्याच व्यक्तिंना परवानगी दिली आहे. पण, यातूनही एका पठ्ठ्यांन भन्नाट मार्ग शोधून काढला. लग्न हे एकदाच होतं आणि ते दणक्यात व्हायलाच हवं, त्यासाठी चेन्नईत पठ्ठ्यानं संपूर्ण विमान बूक केलं आणि हवेत लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे आणि त्या त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळली जाते. पण या व्हिडिओत गर्दी दिसत असून डीजीसीएने (नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय) यांनी हवेतील या विवाहाबद्दल तपास सुरू केला आहे. विमान कंपनी व विमानतळ प्राधिकरणाकडून त्याचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. एअरलाईनला ज्यांनी या विवाहसोहळ्यात कोरोना नियमांना हरताळ फसला त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Rakesh-Dakshina from Madurai, who rented a plane for two hours and got married in the wedding sky. Family members who flew from Madurai to Bangalore after getting married by SpiceJet flight from Bangalore to Madurai. #COVID19India#lockdown@TV9Telugu#weddingrestrictionspic.twitter.com/9nDyn3MM4n
— DONTHU RAMESH (@DonthuRamesh) May 23, 2021
चार्टर्ड फ्लाइटमधील लग्नाने अनेकांचे मन जिंकले परंतु कोविड-सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल याप्रकरणी चौकशी सुरू आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अहवाल मागितला आहे आणि स्पाइसजेट विमानाच्या क्रूची चौकशी केली जाणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. स्पाइसजेट आपली बाजू मांडताना म्हणतं की, प्रवाशांनी वारंवार विनंती करूनही नियमांचे पालन केले नाही म्हणून वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांना कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
DGCA has initiated investigations on mid-air marriage. It has sought a full report from the airline & Airport Authority. SpiceJet crew is off rostered. Airline directed to lodge complaint against those not following COVID appropriate behavior with relevant authorities: DGCA pic.twitter.com/aTNyjIKOFO
— ANI (@ANI) May 24, 2021
लग्न सोहळ्यातील कुटुंबिय, नातेवाईक आणि पाहुणे सर्वजण बोइंग 737 विमानात होते, असे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. तामिळनाडूच्या मदुराई येथील या भन्नाट लग्नानं आता संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. लग्नासाठी या जोडप्यानं मदुराई ते बँगलोर अशा प्रवासासाठी संपूर्ण विमान बूक केलं आणि जेव्हा हे विमान मदुराई मिनाक्षी अम्मन मंदिरावरून जात होतं, तेव्हा कपलनं एकमेकांशी विवाह केला. या विमानात १६१ नातेवाईकांची उपस्थिती होती. राकेश-दक्षिणा हे दोघंही मदुराई येथे राहणारे आहेत. त्यांनी आकाशात लग्न करण्यासाठी दोन तास विमान भाड्यानं घेतलं. तामिळनाडूतील कोरोना नियमांपासून वाचण्यासाठी हा घाट घातला गेला. सर्व नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होते. या व्हिडीओत नवरदेव वधुला मंगळसूत्र घालताना दिसत आहेत.