Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 05:07 PM2024-03-27T17:07:42+5:302024-03-27T17:20:51+5:30
होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली.
बिहारच्या आरा येथे लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रेनच्या एसी बोगीमध्ये आग लागली. बिहारमधील भोजपूर अंतर्गत दानापूर-पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या कारिसाथ स्टेशनजवळ ही घटना घडली. होळी स्पेशल ट्रेनला आग लागली.
ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली होती. 01410 ही होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या खूपच कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे.
बिहार के भोजपुर में देर रात 01410 होली स्पेशल ट्रेन के एसी M–9 (इकोनॉमी) कोच में आग लग गई। हादसे में सभी यात्री सुरक्षित हैं। यह ट्रेन दानापुर से मुंबई के लोकमान्य तिलक टर्मिनस जा रही थी। हादसा कारीसाथ स्टेशन के पास हुआ।दानापुर से यह ट्रेन मंगलवार रात 11:12 बजे चली थी। pic.twitter.com/R5fO0npMQP
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) March 27, 2024
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेन लाईनला लागलेल्या आगीमुळे अनेक ट्रेनच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मात्र, बोगी ट्रेनपासून वेगळी करून होळी स्पेशल ट्रेन रवाना करण्यात आली आहे.
डीआरएम जयंत कुमार, पीएससीओ प्रभात कुमार, आरपीएफ आयजी अमरेश कुमार, वरिष्ठ डीसीएम सरस्वती चंद्रा, आरपीएफ कमांडंट पीके पांडा, वरिष्ठ डीएम-3 संतोष कुमार यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या आगीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
दिनांक 26 और 27 मार्च की मध्य रात्रि लगभग 1:00 बजे पुलिस अधीक्षक भोजपुर को सूचना प्राप्त होती है कि 01410 दानापुर से लोकमान्य तिलक एक्सप्रेस ट्रेन की एक एसी कोच में आग लग गई है और यह घटनास्थल गजराजगंज थाना अंतर्गत कारीसात रेलवे स्टेशन से कुछ दूर पहले है। सूचना प्राप्त होते ही pic.twitter.com/5y1ThvtGsj
— Bhojpur Police (@bhojpur_police) March 27, 2024