Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:46 IST2025-03-28T15:44:49+5:302025-03-28T15:46:02+5:30
Noida Video: विद्यार्थींनीच्या वसतिगृहात अचानक आग लागली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तरुणीने बॉल्कनीतून खाली उतरत होत्या. त्याचवेळी हात निसटला आणि तरुणी खाली पडली.

Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद
Girl Viral Video: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामधील एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॉलेज पार्क ३ मध्ये असलेल्या विद्यार्थींच्या एका वसतिगृहामध्ये अचानक आग लागली. त्यामुळे गोंधळ उडाला. काही मुलींनी बाल्कनीतून खाली उतरत होत्या. त्यात एका मुलीचा पाय सटकला आणि ती खाली पडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नॉलेज पार्क ३ मध्ये अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. आग वाढत असताना विद्यार्थंनी जीव वाचवण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न करत होत्या. शेजारच्या काही व्यक्तींनी त्यांना उतरवण्यासाठी शिडी लावली.
शिडी पडली कमी अन्...
दुसऱ्या मजल्यापर्यंत शिडी पोहचत नव्हती. त्यामुळे विद्यार्थींनी बॉलकनीतून खाली उतरून शिडीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आणि उतरल्या. एक विद्यार्थीनी खाली उतरत होती. तिने हाताने बालकनीचा आधार घेत शिडीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हात निसटला आणि ती दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने विद्यार्थीला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. ती प्रकृती व्यवस्थित आहे.
तरुणी व्हिडीओ
ग्रेटर नोएडा के अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टल में लगी आग, बिल्डिंग से कूंदी छात्राएं, देखें Video.#greaternoida#Fire#Girlshostelpic.twitter.com/BhTgG0ud30
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) March 28, 2025
मुख्य अग्निशामक अधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, सायंकाळी पाच वाजता नॉलेज पार्क ३ मधील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलला आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आग नियंत्रणात आणली. वसतिगृहात काही लोक अडकले होते, पण आमची टीम पोहोचण्यापूर्वीच ते सुरक्षितपणे बाहेर पडले.