VIDEO : आता मराठीतच मिळवा तुमच्या सर्व प्रश्नांची ' उत्तरं'

By admin | Published: October 24, 2016 02:20 PM2016-10-24T14:20:51+5:302016-10-24T15:07:03+5:30

तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं घरबसल्या आणि तीही मराठीत मिळावीत याच हेतून लाँच झाली आहे 'www.uttar.co' ही वेबसाईट..!

VIDEO: Get your answer in Marathi now, answer your questions. | VIDEO : आता मराठीतच मिळवा तुमच्या सर्व प्रश्नांची ' उत्तरं'

VIDEO : आता मराठीतच मिळवा तुमच्या सर्व प्रश्नांची ' उत्तरं'

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - आजच्या टेक्नोसॅव्ही युगात इंटरनेट हा सर्वांच्या जगण्याच मूलभूत भाग बनला असून लहानांपासून-थोरामोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेट अगदी लीलया वापरू लागले आहेत. इंटरनेटवर इंग्रजी भाषेत माहिती उपलब्ध असते, मात्र प्रत्येकालाच इंग्रजीतल्या या सर्व गोष्टी समजतीलच असे नाही. त्यामुळे बरेच जण व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि काही वेबसाईट्स सर्च करणं या पलीकडे इंटरनेट वापरत नाहीत. कोरा सारख्या काही साईट्सवर करीअर संदर्भात, शिक्षणासंदर्भात प्रश्न विचारायचे आणि तज्ज्ञांकडून उत्तरं मिळवायची सोय उपलब्ध आहे, जिचा लाभ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तरूणांना घेता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेत स्थायिक असलेल्या चंद्रशेखर गारकर या तरूणाने  ' www.uttar.co ' ही मराठी वेबसाईट लाँच केली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर घरबसल्या आणि तीही मराठीत सहजपणे मिळू शकणार आहेत. तुम्ही तुमचा प्रश्न विचारला की त्या त्या क्षेत्रातले मराठीमधले तज्ज्ञ उत्तर डॉट को वर मार्गदर्शन करतील आणि त्याचा लाभ सगळ्यांना होईल अशी ही कल्पना आहे.
मूळचा अहमदनगरचा मात्र सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणा-या चंद्रशेखरने ही वेबसाईट लाँच केली असून प्रसिद्ध ' कोरा' ( प्रश्नोत्तरांच्या) या इंग्रजी वेबसाईटप्रमाणेच ही वेबसाईट आहे. त्याद्वारे मराठीमधील सर्व ज्ञान(Knowledge Base) गोळा करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे चंद्रशेखरने केला आहे. 
चंद्रशेखरला त्याच्या गावाकडच्या विद्यार्थ्याने करी्र गाईडन्सबद्दलचे काही प्रश्न विचारले, काही दिवसांनी आणखी एका मुलाने त्याच्याकडे माहिती मागितली. त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कळू शकेल अशा भाषेत माहिती उपलब्ध नाही हे त्याच्या लक्षात आले व त्याने ' प्रत्येक समस्येचे उत्तर मिळू शकेल अशी वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच ' उत्तर' (वेबसाईट)चा जन्म झाला. 
सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये समजतातच असं नाही, परिणामी बरेच लोक इंटरनेटच्या योग्य उपयोगापासून दूर राहतात. बऱ्याचदा काही लोकांना प्रश्न पडतात, परंतु इंग्रजीचा सराव नसणे किंवा इंग्रजी भाषेचाच न्यूनगंड असणे या कारणाने योग्य माहिती अशा लोकांपर्यंत पोहचत नाही.  त्याचप्रमाणे अफाट बुद्धिमत्ताअसलेले बरेच लोक आपले ज्ञान दुस-यांपर्यंत पोहचवण्यासाठी उत्सुक आहेत.
अशा सर्व व्यक्तींना ' उत्तर'च्या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळेल या विश्वासाने त्याने या वेबसाईटची निर्मिती केली असून या वेबसाईटद्वारे मराठीमध्ये सर्व ज्ञान गोळा करण्याचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे. आपली भाषा आणखी समृद्ध व्हावी, योग्य ज्ञानाचा फायदा योग्य लोकांना व्हावा आणि मराठी भाषा इंटरनेटच्या या भव्य जाळ्यामध्ये गुंफली जावी, हेही त्याचे ध्येय आहेच. 
  

Web Title: VIDEO: Get your answer in Marathi now, answer your questions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.