Video : चक्क उमेदवारानेच EVM जमिनीवर आदळली, पोलिसांकडून पुढाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 10:20 AM2019-04-11T10:20:33+5:302019-04-11T10:21:57+5:30
देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे.
हैदराबाद - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहे. पूर्वोत्तर राज्यांसह आंध्रप्रदेश मध्येही लोकसभेसह विधानसभा निवडणुकांसाठी मतदान घेण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवारीने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली आहे. त्यानंतर, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागांसह विधानसभेच्या 175 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे विधानसभा उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी चक्क मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. मशिन सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्याने ईव्हीएम मशिन बोगस असल्याचे सांगत रागारागात गुप्ता यांनी ईव्हीएम मशिन दोन हातांनी हातात घेऊन जोरदार जमिनीवर आपटली. त्यामुळे ईव्हीएम मशिन खराब झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे. मात्र, या घटनेनंतर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
#WATCH Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes an Electronic Voting Machine (EVM) at a polling booth in Gooty, in Anantapur district. He has been arrested by police. #AndhraPradeshpic.twitter.com/VoAFNdA6Jo
— ANI (@ANI) April 11, 2019