VIDEO - 2019 मध्ये देशाला अच्छे दिन येतील - राहुल गांधी
By admin | Published: January 11, 2017 12:17 PM2017-01-11T12:17:48+5:302017-01-11T12:26:41+5:30
सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधानांनी नोटाबंदीवर उडी मारली. अच्छे दिन कधी येणार ? म्हणून लोक वाट बघतायत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधानांनी नोटाबंदीवर उडी मारली. अच्छे दिन कधी येणार ? म्हणून लोक वाट बघतायत. मी देशावासियांना सांगू इच्छितो 2019 साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर देशाला अच्छे दिन येतील असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी बुधवारी जनवेदना मेळाव्यात बोलताना सांगितले.
राहुल गांधींनी जनवेदना मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर चौफेर हल्ला चढवला. आम्ही 70 वर्ष संस्थांचा आदर केला, मोदी आणि आरएसएसने अडीचवर्षात सर्वकाही बदलून टाकले. भाजपा, आरएसएस आणि नरेंद्र मोदींनी मिळून आरबीआय सारख्या संस्थेला कमजोर केले असा आरोप राहुल यांनी केला.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर गाडयांची विक्री 60 टक्क्यांनी कमी झाली आपण 16 वर्ष मागे गेलो. पंतप्रधानांनी देशाच्या अर्थव्यस्थेचा कणा मोडला असे आरोप राहुल यांनी केली. मोदी आणि मोहन भागवतांनी एका फटक्यात लोकांचे घामाचे पैसे, कागदामध्ये बदलले असे राहुल यांनी सांगितले.
#WATCH "'Acche Din' (good days) will only come when Congress party comes back to power, in 2019," says Congress Vice President Rahul Gandhi pic.twitter.com/4wMtOJpxaN
— ANI (@ANI_news) 11 January 2017