Video - गुजरातमध्ये दारुच्या नशेत महिलेचा रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा; पोलिसांवर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:58 PM2023-08-28T14:58:07+5:302023-08-28T15:02:45+5:30
महिला दारूच्या नशेत गाडी चालवत होती तेव्हा तिची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. पोलिसांना थांबवलं असता, तिने अटकेला विरोध केला आणि यावरून जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली.
गुजरातमध्ये रविवारी रात्री एका मद्यधुंद महिलेने रस्त्यावर गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. रविवारी महिला दारूच्या नशेत गाडी चालवत होती तेव्हा तिची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. पोलिसांनी थांबवलं असता, तिने अटकेला विरोध केला आणि यावरून जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ही महिला पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तसेच महिला पोलिसांवर हल्ला करतानाही दिसते. महिला पोलिसाने तिला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. महिलेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं. याच दरम्यान, तेथे उपस्थित अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.
Scenes from Vadodara. (Use headphones)pic.twitter.com/SJ17D6rbfI
— Prayag (@theprayagtiwari) August 27, 2023
अखेर महिला पोलीस तिला जीपमध्ये बसवून घेऊन गेले. मद्यप्राशन करून गाडी चालवणं, गोंधळ घालणं आणि सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणं या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक युजर्सनी या महिलेची ओळख फेम नेल आर्टिस्ट म्हणून केली आहे. दारूबंदी असतानाही गुजरातमध्ये अवैधरित्या दारूची विक्री आणि सेवन केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.