गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:38 PM2023-07-24T14:38:01+5:302023-07-24T14:45:58+5:30
इमारतीच्या खालच्या बाजुला दुकाने आणि मागील बाजूस घरे आहेत. त्यामुळे येथील अनेक जण अडकण्याची भीती आहे.
गुजरातमधील जुनागडमध्ये एक धक्कादायक घटन घडली आहे. एक दुमजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली 10 ते 12 जण अडकल्याची भीती आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ही दुर्घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जुनागडमध्येही यापूर्वी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
इमारतीच्या खालच्या बाजुला दुकाने आणि मागील बाजूस घरे आहेत. त्यामुळे येथील अनेक जण अडकण्याची भीती आहे. त्यामध्ये दुकानांमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांचाही समावेश असू शकतो. स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात येत आहे.
#WATCH | Gujarat | A two-storeyed building collapsed in Junagadh. Several feared trapped. Further details awaited. pic.twitter.com/nxVeU0njSn
— ANI (@ANI) July 24, 2023
एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एनडीआरएफला तैनात करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे घर जीर्ण झाली होती आणि आता ती कोसळल्याची माहिती मिळत आहे. रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.
#Gujarat
— Smriti Sharma (@SmritiSharma_) July 24, 2023
Building collapsed in #Junagadh
A 3-storey building collapsed in Kadiyawad area
3 to 4 people are suspected to be buried#GujaratRainpic.twitter.com/lorPNrrsyk