VIDEO: शूटिंगसाठी हॅलिकॉप्टरचा स्टंट 2 अभिनेत्यांच्या जीवावर

By admin | Published: November 7, 2016 07:39 PM2016-11-07T19:39:21+5:302016-11-07T21:45:58+5:30

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान स्टंट करणं दोन अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं. सोमवारी शूटींगच्या वेळी हॅलिकॉप्टरमधून डॅममध्ये उडी

VIDEO: The helicopter stunts for the shooting of 2 actors | VIDEO: शूटिंगसाठी हॅलिकॉप्टरचा स्टंट 2 अभिनेत्यांच्या जीवावर

VIDEO: शूटिंगसाठी हॅलिकॉप्टरचा स्टंट 2 अभिनेत्यांच्या जीवावर

Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7- कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान स्टंट करणं दोन अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं. सोमवारी शूटींगच्या वेळी हॅलिकॉप्टरमधून डॅममध्ये उडी मारण्याचा स्टंट करायचा होता. मात्र, डॅममध्ये उडी मारल्यापासून ते दोघं बेपत्ता आहेत. उदय आणि अनिल अशी दोघा अभिनेत्यांची नावं असून दोघांचा कसून शोध घेतला जात आहे. 
चित्रपट 'मस्ती गुडी'च्या चित्रीकरणादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. बंगळुरूपासून 35 किलोमीटर दूर थिप्पागोंडनहल्ली डॅममध्ये दुपारी पावणे तीनच्या सुमारास दोघा अभिनेत्यांनी स्टंट करण्यासाठी उडी मारली. बराच वेळ झाला तरी दोघं बाहेर न आल्याने चित्रीकरणादरम्यान खळबळ उडाली. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. 
मिळालेल्या माहितीनुसार, तीन अभिनेत्यांनी डॅममध्ये उडी मारली होती. चित्रपटात मुख्य भूमिका असलेला अभिनेता दुनिया विजय यांनीही डॅममध्ये उडी मारली. मात्र, विजयकडे लाइफ जॅकेट होते त्यामुळे तो वेळेत बाहेर येऊ शकला. तर बेपत्ता असलेल्या दोघा अभिनेत्यांना लाइफ जॅकेट देण्यात आलं नसल्याचं वृत्त आहे. तसेच दोघांनी उडी मारल्यावर लगेचच त्या ठिकाणी बोट पोहोचणं आवश्यक होतं मात्र, बोट वेळेवर पोहोचू शकली नाही असंही सांगितलं जात आहे.  योग्य सुरक्षा व्यवस्था न ठेवल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक चित्रपटांत काम केलेल्या उदयला जयम्माना मागा या चित्रपटात बेस्ट व्हिलेनचा अवॉर्डही मिळाला आहे तर अनिल आपल्या 8 -पॅक अॅब्ससाठी प्रसिद्ध आहे, आतापर्यंत त्यांनी 25 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे.  

Web Title: VIDEO: The helicopter stunts for the shooting of 2 actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.