Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 06:26 PM2019-10-07T18:26:44+5:302019-10-07T18:42:44+5:30
भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात.
नवी दिल्ली: भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात. त्यातच देशभरात सर्वत्र नवरात्री हा सण साजरा करण्यात येत असतानाच सीमारेषेवर जवान देखील गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शेअर केला आहे.
जितेंद्र सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून उणे शून्य डिग्री तापमानात जवान गरबा खेळत नवरात्रोत्सव साजरा करत असून जवानांची हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते असंम्हणत भारतीय जवानांचा बर्फवृष्टीमध्ये गरबा करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Proud Soldiers of #IndianArmy celebrate and perform Garba in chilling Sub-Zero degree temperature. That is the spirit that makes India invincible ... Kuchh Baat Hai Ki Hasti Mit-ti Nahin Hamari !#Mahanavami#Dussehrapic.twitter.com/S3cXbpnjIJ
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) October 7, 2019
लाहौल-स्पीती आणि कुल्लूमध्ये सोमवारी जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्याकडून येत्या काही दिवसांमध्ये देशातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जम्मू आणि काश्मीर परिसराट गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि विदर्भातही पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Himachal Pradesh: Higher reaches of Lahaul-Spiti and Kullu districts received snowfall today. pic.twitter.com/wOUk5AzE3j
— ANI (@ANI) October 7, 2019