VIDEO: अरे बापरे ! कारमधून गाईचं अपहरण

By admin | Published: August 20, 2016 02:47 PM2016-08-20T14:47:47+5:302016-08-20T14:47:47+5:30

कारमधून गाईचं अपहरण करणा-या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका आरोपीलाही अटक केली आहे

VIDEO: Hey father! Cows kidnapping from the car | VIDEO: अरे बापरे ! कारमधून गाईचं अपहरण

VIDEO: अरे बापरे ! कारमधून गाईचं अपहरण

Next
>- ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. 20 - कारमधून गाईचं अपहरण करणा-या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गोध्रा पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीलाही अटक केली आहे. काही दिवसांपुर्वी काही तरुण एका गाईचं चक्क कारमधून अपहरण करत असल्याचं सीसीटीव्ही समोर आलं होतं. हे सीसीटीव्ही सोशल मीडियावरही व्हायरल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 
 
अपहरणाचं हे सीसीटीव्ही हाती आल्यानतंर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. सीसीटीव्हीमध्ये काही तरुण जबरदस्तीने एका गाईला टाटा इंडिगो कारमध्ये घुसवताना दिसत आहेत. आणि त्यानंतर तेथून पळ काढतात. हे सीसीटीव्ही काही गोरक्षकांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं होतं. 
 
अटक केलेल्या आरोपीचं नाव रसुलभाई असून मोहम्मग मोहल्लामध्ये तो राहतो. पोलिसांनी अपहरणासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे. फरार आरोपीच्या घराबाहेरुन ही कार जप्त केली. 
 

Web Title: VIDEO: Hey father! Cows kidnapping from the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.