Video - हायव्होल्टेज ड्रामा! प्रियकराशी भांडण होताच प्रेयसी थेट टॉवरवर चढली, रुसून बसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 10:48 AM2023-08-07T10:48:34+5:302023-08-07T10:54:00+5:30
संतापलेली विवाहित प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढली, त्यानंतर तिचा प्रियकरही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या मागे टॉवरवर चढला
छत्तीसगडच्या कोडगार गावात प्रियकर-प्रेयसीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. संतापलेली विवाहित प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढली, त्यानंतर तिचा प्रियकरही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या मागे टॉवरवर चढला. हे प्रकरण पेंड्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरेला पोलीस स्टेशन हद्दीतील नेवरी नवापारा येथे राहणाऱ्या अनिता भैना हिचे कोडगार गावातील रहिवासी मुकेश भैनासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते.
अनिता विवाहित आहे. 6 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं, मात्र पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे मुकेशसोबत प्रेमसंबंध होते.काही दिवसांपूर्वी प्रेयसी अनिता तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी कोडगार गावात आली होती. दोघेही एकाच घरात एकत्र राहत होते. गुरुवारी दोघांमध्ये कशावरून वाद झाला. यामुळे संतापलेल्या महिलेने घर सोडलं आणि शेतातील हायटेन्शन टॉवरवर चढली. ती टॉवरवर जाऊन बसली.
*Upset with lover, Girlfriend Climbs high Tension tower, then lover also climbs*
— keshaboina sridhar (@keshaboinasri) August 6, 2023
This is the first time I have seen someone climb them to commit suicide upset with her lover. Good news, the boyfriend followed her up and convinced her to climb down. All iz well Chhattisgarh today pic.twitter.com/oPqiK0EMpl
काही ग्रामस्थांनी टॉवर पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून महिलेला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना दूरवरून ती महिला ओळखता आली नाही. इकडे महिला हायटेन्शन टॉवरवर चढल्याची चर्चा गावात पसरली. हळूहळू गावकरी मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. दरम्यान प्रियकर मुकेश भैनाही टॉवरजवळ पोहोचला. अनिताला पाहताच त्याने तिला ओळखले आणि तिची समजूत घालण्यासाठी तोही हायटेन्शन टॉवरवर चढला.
प्रियकर महिलेची समजूत घालत होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर ती थोडी खाली आली. दोघही टॉवरच्या मध्यभागी येऊन बसले. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पेंड्रा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मनारायण तिवारी यांनी सांगितले की, हायटेन्शन टॉवरमध्ये विजेचा प्रवाह सतत सुरू होता, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही ही दिलासादायक बाब आहे. दोघांची चौकशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ वादातून महिलेने असे पाऊल उचलले होते. आता तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.