'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:07 PM2024-07-28T15:07:13+5:302024-07-28T15:08:00+5:30

दिल्लीतील एका UPSC कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बूडन मृत्यू झाला. या घटनेनंतर UPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

VIDEO: 'I am one of you; Assure you', IPS officer's emotional appeal to protesting students | 'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

नवी दिल्ली : काल(दि.27) रात्री उशीरा दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगरमधील 'राव आयएएस' कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बूडन मृत्यू झाला. या घटनेत कोचिंग सेंटरचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. परवानगी नसताना त्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये कोचिंग सेंटर सुरू होते. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेले यूएसपीसीचे विद्यार्थीआंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांना समजावण्यासाटी वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.

मी तुमच्यापैकीच एक..; IPS अधिकाऱ्याची अपील
दरम्यान, आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी आलेले दिल्ली अतिरिक्त डीसीपी सचिन शर्मा यांनी त्यांना भावनिक आवाहन केले. "आम्ही पोलीस युनिफॉर्ममध्ये आहोत, म्हणून आम्हालाच काहीच वाटत नाही, असे समजू नका. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, याची पूर्ण कल्पना मला आहे, कारण मीही याच टप्प्यातून गेलोय. माझ्या मनातही तुमच्यासारख्याच भावना आहेत. मीही तुमच्यापैकीच एक भाग आहे. आम्ही तुमच्यापासून काहीही का लपवू? आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, कायद्यात राहून जे शक्य असेल ते आम्ही करू," असे आश्वासन त्यांनी यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांना दिले. 

फौजदारी गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी परवानगीशिवाय तळघरात 'राव आयएएस' कोचिंग सेंटरद्वारे क्लासेस चालवले जात होते. फायर एनओसीनुसार, या जागेला गोडाऊन आणि पार्किंगसाठी परवानगी देण्यात आली होती. पण, कोचिंग सेंटरवाल्यांनी या ठिकाणी लायब्रेरी बांधली. या प्रकरणी कोचिंग सेंटरच्या मालक आणि संयोजकाला दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम 105,106(1), 152,290 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली सरकारने चौकशीचे आदेश दिले
दिल्ली सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, या घटनेतील दोषींना कडक शिक्षा दिली जाईल. 

Web Title: VIDEO: 'I am one of you; Assure you', IPS officer's emotional appeal to protesting students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.