Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:52 PM2021-03-25T14:52:00+5:302021-03-25T14:56:41+5:30

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय.

Video: I myself demand an inquiry, Arvind Sawant is passionate in the Lok Sabha | Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

Next
ठळक मुद्देशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही.

नवी दिल्ली -सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी लोकसभेत बोलताना खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. यानंतर मध्यंतरात शिवसेनेचे नेते खासदारअरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर, आता खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उत्तर दिलंय, तसेच याप्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केलीय. (shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant)

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही. त्यामुळे, आता याप्रकरणी मीच चौकशीची मागणी करतोय, असे भावनिक उद्गार खासदार सावंत यांनी संसदेत बोलताना काढले. 


जे पत्र अध्यक्ष महोदयांना लिहिण्यात आले, ते पत्र सोशल मीडियात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून मी देशात बदनाम झालोय. विशेष म्हणजे महिलांचा अपमान केल्यामुळे. त्यामुळे, आपण सीसीटीव्ही तपासा, त्या पत्रात लिहिलेलं बोलण्यासाठी मला तिथं थांबाव लागलं असेल ना, तेही पाहा. आपण, माझा इतिहास तपासा आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांचाही इतिहास तपासा. मी आयुष्यात कधीच कुणाला अवमानित केलं नाही, असे म्हणत सावंत यांनी पोटतिडकीनं आपली बाजू मांडली. यापूर्वीही अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

यापूर्वीचं अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण 

मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात. तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणे बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल", असे अरविंद सावंत म्हणाले. 

माझ्यावरही आरोप केले - संजय राऊत 

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते, असे सांगत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. 
 

Web Title: Video: I myself demand an inquiry, Arvind Sawant is passionate in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.